मिसोरी (अमेरिका) : अमेरिकेच्या मिसोरीत अॅमट्रक रेल्वेगाडी रुळावरुन घसरुन मोठा अपघात झाला आहे. ही दुर्घटना सोमवारी घडली, अशी माहिती मिसोरी स्टेट हायवे पॅट्रोल ट्रूप बीचे प्रवक्ते जस्टीन डन यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.
रेल्वे दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू, तर एकाची स्थिती चिंताजनक आहे अशी माहिती मिसोरी स्टेट हायवे पॅट्रोल कॉर्पोरलने दिली. रेल्वे ही ट्रकला धडकली. ही घटना मेंडन शहरात घडली. जवळपास ५० लोक या अॅमट्रक रेल्वे दुर्घटनेत जखमी झाले आहेत. जवळपास २४३ प्रवाशी आणि १२ क्रू मेंबर्स रेल्वेत होते.