वॉशिंग्टन: अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांची हकालपट्टी केली आहे. एस्पर यांच्या जागी राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्राचे संचालक ख्रिस्तोफर मिलर यांची नेमणूक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, ट्रम्प यांच्या सत्तेचा कार्यकाळ संपण्यासाठी फक्त ७२ दिवस उरले आहेत. त्यामुळे ट्रम्प यांच्या या निर्णयावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
अमेरिकन माध्यमांमध्ये संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांना संरक्षण मंत्रीपदावरून हटवण्यात येणार असल्याची चर्चा आधीपासूनच सुरू होती. मात्र, राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर डोनाल्ड ट्रम्प एवढा मोठा निर्णय घेतील याची खात्री कोणालाही नव्हती. ट्रम्प आणि एस्पर यांच्यात अनेक मुद्यांवर मतभेद असल्याचीही चर्चा होती.
नितीश कुमारच मुख्यमंत्री होणार