Thursday, September 28, 2023

ट्रम्पकडून निवडणूक अधिकाऱ्याची हकालपट्टी

वॉशिंग्टन : मतदानात फेरफार झाल्याच्या मुद्यावरून ट्रंप यांना आक्षेप घेणाऱ्या एका उच्चपदस्थ निवडणूक अधिकाऱ्यांची ट्रम्प यांनी निलंबित केले आहे. सायबर सेक्युरिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चर एजन्सी (सिसा)चे प्रमुख क्रिस क्रेब्स यांना मतदानासंदर्भात चुकीचे वक्तव्य केल्याप्रकरणी निलंबित करण्यात येत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.

राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीत पराभव झाल्याचे ट्रम्प यांनी अद्याप मान्य केलेले नाही. मतदानात मोठ्या प्रमाणावर फेरफार झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे. निवडणूक अधिकारी मात्र ही सगळ्यात सुरक्षित निवडणूक असल्याचे सांगत आहेत. सायबर सेक्युरिटी अँड इन्फ्रास्ट्रक्चरचे सहाय्यक संचालक ब्रायन वेयर यांनीही पदाचा राजीनामा दिला होता.

व्हाईट हाऊसकडून त्यांना तशा सूचना देण्यात आल्या होत्या. दरम्यान निलंबित केले असले तरी वक्तव्याप्रकरणी खंत वाटत नाही, असे क्रेब्स यांनी म्हटले आहे़ मी निवडणूक जिंकलो, अशा आशयाचे ट्वीट डोनाल्ड ट्रंप यांनी केल्याने पुन्हा एकदा अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठीच्या निकालांवरून चर्चेला सुरुवात झाली आहे. मात्र ट्रम्प यांच्या ट्वीटखाली अधिकृत सूत्रे निवडणुकीचा निकाल वेगळा सांगतात अशी सूचनाही येते आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी पहिल्यांदाच जो बायडन यांनी निवडणूक जिंकल्याचे मान्य केल्यासारखे वाटले मात्र त्यांनी पुन्हा ट्वीट करून जुना हेका सोडला नव्हता.

जि. प. सदस्य अपात्रता प्रकरण; मोहिते-पाटील गटाला सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या