वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्ष पदावरुन पायउतार होण्यास अवघे काही दिवस राहीले असताना जाता-जाता ट्रम्प यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे तुर्कस्थानला जबर झटका बसला आहे. ट्रम्प यांचा हा निर्णय भारताच्या संदर्भात सकारात्मक असल्यामुळे त्यांनी भारताशी असलेली मैत्री राखली असल्याचीही त्यामुळे चर्चा होत आहे.
ट्रम्प प्रशासनाने नाटोमध्ये सहभागी असलेल्या तुर्कीला अमेरिकेत बंदी घातली आहे. रशियाकडून कोणतेही शस्त्र घेण्यास अमेरिकेची बंदी असून तुर्कीने रशियाकडून एस-४०० एयर डिफेंस सिस्टम खरेदी केल्यामुळे अमेरिकेने तुर्कीवर बंदी घातली. ट्रम्पच्या या निर्णयावर तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तैयब एर्डोगन यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
लातूरचे नाव आता आरोग्य क्षेत्रात उंचावेल – आमदार धिरज देशमुख