31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeआंतरराष्ट्रीयघोटाळ्याप्रकरणी ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ

घोटाळ्याप्रकरणी ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ

एकमत ऑनलाईन

वॉशिग्टन : डोनाल्ड ट्रम्प यांना नुकताच राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभव स्विकारावा लागला. यानंतर आता त्यांच्या अडचणीत अधिकच वाढ झाली असून त्यांना काही घोटाळ्यांच्या आरोपाखाली तुरूंगात जावे लागणार असल्याची चर्चा सुरू आहे.

बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळात काही घोटाळे झाले होते. राष्ट्रपती असताना या खटल्यांपासून ते दूर होते़ मात्र आता राष्ट्राध्यक्ष पद गेल्याने हे खटले त्यांच्यावर चालवले जाणार आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर मनी लॉंड्रिन्ग, निवडणुकीत केलेले घोटाळे, गैरव्यवहार या प्रकरणी आरोप लागण्याची शक्यता आहे. सध्या ट्रंप यांच्या आर्थिक घोटाळ्याबाबत चर्चा केली जात आहे. मात्र प्रशासकीय यंत्रणेमध्येही ट्रम्प यांनी घोटाळा केल्याचे सांगितले जाते.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोर अडचणींचा डोंगर उभा आहे. ट्रम्प यांच्यावर कोट्यवधींचे कर्ज आहे. पुढील चार वर्षात त्यांना ३० कोटींहून अधिक कर्ज फेडायचे असल्याचे सांगण्यात येते. करोनामुळे आलेल्या आर्थिक मंदीमुळे त्यांच्या अडचणीत अधिकच वाढ झालीय.

ट्रम्प यांच्यावर प्रशासकीय विभागातही घोटाळा केल्याचा आरोप आहे. २०२० च्या सुरूवातीलाच त्यांच्यावर महाभियोग खटला चालवण्यात आला होता. मात्र राष्ट्राध्यक्ष असल्यामुळे ते सहीसलामत सुटले होते.

प्रादेशिक अखंडतेचा आदर करा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या