31 C
Latur
Thursday, January 21, 2021
Home आंतरराष्ट्रीय ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट कायमचे बंद

ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट कायमचे बंद

एकमत ऑनलाईन

सॅनफ्रान्सिस्को : अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी देशाच्या संसदेवर केलेल्या हल्ल्यानंतर त्यांच्यावर जगभरातून टीका होत असतानाच आता ट्विटरने ट्रम्प यांना जोरदार दणका दिला आहे. ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊंट कायमस्वरूपी बंद करण्याचे निर्णय ट्विटरने घेतला आहे. त्याचबरोबर, या सरकारी ट्विटर अकाऊंटवर ट्रम्प यांनी शुक्रवारी केलेले नवे ट्वीट देखील डिलिट केले आहेत.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यापासून बिथरलेले डोनाल्ड ट्रम्प सातत्याने काही ना काही वक्तव्ये करत आहेत. अपेक्षित मते मिळाली नसतानाही आपणच जिंकणार असा दावा ट्रम्प शेवटपर्यंत करत होते. सत्ता हस्तांतरणाचा क्षण जसजसा जवळ येऊ लागला होता, तशी त्यांची घालमेल वाढली होती. त्यांच्या पाठीराख्यांमध्येही अस्वस्थता होती. अमेरिकी संसदेतही पारडे ज्यो बायडन यांच्या बाजूने झुकल्यानंतर ट्रम्प यांच्या समर्थकांचा थेट अमेरिकी संसदेत (कॅपिटल हिल) धुडगूस घातला होता.

सीएए विरोधी आंदोलन दहशतवादी कृत्य; गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,414FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या