अंकारा: तुर्कीमधील इजमिर शहरात शुक्रवारी आलेल्या भूकंपामुळे हाहाकार उडाला. भूकंपात कोसळलेल्या इमारतींच्या ढिगा-यातून लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु असून आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ८०० जण जखमी झाले आहेत. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तुर्कीतील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, आरोग्य मंत्री फर्हेटीन कोका यांनी सांगितले की, ४३५ जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. तर, २५ जणांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. नऊ जणांवर शस्त्रक्रिया पार पडली असल्याची माहिती त्यांनी दिली. त्याशिवाय ३६४ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. इजमिरमध्ये मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
राज्यांना लसीकरणासाठी सज्जतेच्या केंद्रसरकारच्या सूचना