30.5 C
Latur
Monday, March 1, 2021
Home आंतरराष्ट्रीय काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्याचा टर्कीचा इरादा

काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्याचा टर्कीचा इरादा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : टर्की हा इस्लामी देश पाकिस्तानच्या मदतीने जम्मू-काश्मीरात मोठा कट रचण्याच्या तयारीत असल्याची माहिती उघडकीस आली आहे. ग्रीसमधील प्रसारमाध्यमांनी याबाबत भारत सरकारला सावधानतेचा इशारा दिला आहे. गेल्या वर्षापासून टर्की व पाकिस्तान यांच्यातील मैत्री जास्तच दृढ होत चालली आहे. दोन्ही इस्लामी राष्ट्रे असल्याने त्यांचा काश्मीरमधील भारत सरकारच्या शांतता प्रयत्नांवर जळफळाट सुरु आहे. मात्र त्यांच्या टीकेला भारत सरकारने काडीचीही भीक न घातल्याने हे दोन्ही देश संतापले आहेत. दुसरीकडे टर्कीलाही इस्लामी राष्ट्रांचा नेता म्हणून पुढे यायचे आहे. त्यासाठी काश्मीरप्रश्नी पाकिस्तानला मदत करण्याचा त्याचा इरादा आहे. काश्मीरमध्ये घातपात घडविण्यासाठी टर्कीचे राष्ट्राध्यक्ष रिसीप तयिप एर्दोगनने दहशतवाद्यांची एक तुकडी पाठवण्याची तयारी सुरु केल्याचे वृत्त आहे.

एर्दोगनने या घातपाती कारवायांसाठी तिच्या लष्करी संघटना सादातच्या जवानांची एक तुकडी तयार केली आहे. एर्दोगोन यांचा प्रमुख सहकारी असलेल्या अदनाना तनरिवर्दीकडे या दुष्कृत्याची जबाबदारी सोपवली असून काश्मीरमधील सय्यद गुलाम नबी फई नावाच्या भगोड्या दहशतवाद्याला व आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संघटनेच्या मदतीने काश्मीरात हल्ले करण्याची योजना असल्याचे ग्रीसमधील प्रसार माध्यमांकडून भारताला सांगण्यात आले असल्याचे वृत्त आहे.

फई हा जमाते इस्लामीचा सदस्य असून आयएसआयच्या पैशांच्या मदतीने भारताविरोधात तरुणांची माथी भडकवून त्यांना अतिरेकी कारवायांमध्ये भरती करण्यासाठी काम करतो. सध्या हा भगोडा अमेरिकेतून कार्यरत असून त्याने काश्मीरविरोधात कट रचण्यासाठी अमेरिकन काउन्सिल ऑफ काश्मीरची स्थापना केली आहे. टॅक्स चोरीच्या प्रकरणांमध्ये अमेरिकेत दोन वर्षाची तुरुंगवासाची शिक्षाही त्याने भोगली आहे. काश्मीरसंदर्भात फई आजही सक्रीय असल्याचा इशारा ग्रीसने दिला आहे. तनरिवर्दी व फई हे दोघे मिळून काश्मीरमध्ये मोठा कट रचण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले आहे.

आगामी काही महिन्यांत मोबाईलचा खर्च वाढणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या