27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeआंतरराष्ट्रीयमोबाईल बंद ठेवा, आणि थोडं आयुष्य जगा!

मोबाईल बंद ठेवा, आणि थोडं आयुष्य जगा!

एकमत ऑनलाईन

मोबाईलचा शोध लावणारे कूपर यांचा सल्ला

या डिजिटल जगात आज प्रत्येकांकडे स्वत:चा फोन आहे. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण आज मोबाईल वापरतात पण मोबाईलचा शोध लावणारे मार्टिन कूपर स्वत: मोबाईल फोन वापरत नाहीत, असे सांगितले तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही.

१९७३ मध्ये मार्टिन कूपरने मोटोरोला कंपनीच्या त्यांच्या टीमचा पहिला मोबाइल शोधला. ज्याचे वजन दोन किलो होते. न्यूयॉर्कच्या रस्त्यावर उभे राहून जेव्हा मार्टिन कूपरने त्याच फोनवरून पहिला कॉल केला तेव्हा त्याचा शोध कितपत यशस्वी होईल याची त्यांना कल्पना नव्हती. पण आता मार्टिन कूपर लोकांना मोबाईलचा वापर कमी करण्याचा सल्ला देत आहेत.

एका मुलाखतीत त्यांनी तर सर्वांनाच खुलासा केला. या मुलाखतीत ते म्हणाले की, ते २४ तासात फक्त ५ टक्के वेळ मोबाईल वापरण्यात घालवतात. मुलाखतीत त्यांना विचारण्यात आले की, जे लोक दिवस-रात्र मोबाईल वापरतात त्यांचे काय होणार? यावर मार्टिन म्हणाले की, अशा लोकांनी आपला मोबाईल बंद करून थोडे आयुष्य जगायला हवे.

मार्टिनने पहिल्या फोनचा शोध लावला तेव्हा मोबाईल १० तासात चार्ज होत असे आणि तो मोबाईल फक्त २५ मिनिटे चालायचा. त्यांनी बनवलेल्या फोनची लांबी दहा इंच होती. आता ५० वर्षांनंतर मार्टिनला असे वाटते की मोबाईलमुळे लोकांच्या जगण्याचा आनंद हरवला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या