31.3 C
Latur
Tuesday, May 30, 2023
Homeआंतरराष्ट्रीयअमेरिकेत दोन लष्करी हेलिकॉप्टरची धडक : ९ जणांचा मृत्यू

अमेरिकेत दोन लष्करी हेलिकॉप्टरची धडक : ९ जणांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

केंटुकी : अमेरिकेतील केंटुकी येथे बुधवारी रात्री दोन लष्करी हेलिकॉप्टरची धडक झाली. मीडिया रिपोर्टस्नुसार या अपघातात ९ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अद्याप अधिकृतपणे याला दुजोरा मिळालेला नाही.

केंटुकीच्या ट्रिग काऊंटीमधील फोर्ट कॅम्पबेल मिलिटरी बेसजवळ हा अपघात झाला. लष्करी अधिका-याने सांगितले की, हा अपघात रात्री ९.३० वाजता झाला. दोन एचएच६० ब्लॅकहॉक्स नियमित लष्करी प्रशिक्षणावर होते. केंटुकीचे गव्हर्नर म्हणाले की, ही वाईट बातमी आहे. आता येत असलेल्या बातम्यांनुसार, मृतांची संख्या वाढू शकते.

‘रॉयटर्स’च्या वृत्तानुसार, केंटुकीमधील वेगवेगळ्या ठिकाणांहून बचाव कर्मचा-यांची टीम तैनात करण्यात आली आहे. बीबीसीच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेचे हल्ला करणारे हेलिकॉप्टर आदळले. ते १०१ व्या एअरबोर्न डिव्हिजनचे होते. हे हेलिकॉप्टर्स जगातील अनेक देशांमध्ये लढाईदरम्यान तैनात करण्यात आले होते.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या