25.6 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeआंतरराष्ट्रीयकांगोत भारताचे दोन जवान शहीद

कांगोत भारताचे दोन जवान शहीद

एकमत ऑनलाईन

किन्शासा : कांगोमधील गोमा शहरात संयुक्त राष्ट्रांविरोधात सुरु असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यात आज भारताने पाठविलेल्या शांती सैन्यातील दोन जवान हुतात्मा झाले.

या संघर्षात एकूण पाच जणांचा मृत्यू झाला, तर ५० जण जखमी झाले. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करताना हल्लेखोरांना शिक्षा करण्याची मागणी केली आहे. कांगोचे सैन्य आणि बंडखोर गटांमध्ये गेल्या काही वर्षांपासून संघर्ष सुरु आहे.

येथे संयुक्त राष्ट्रांतर्फे सुमारे सोळा हजार शांती सैनिक तैनात आहेत. काँगोमधील संघर्ष थांबविण्यात शांती सैन्यालाही अपयश येत असल्याचा दावा करत आंदोलकांनी गोमा शहरात निदर्शने सुरु केली आहेत. या आंदोलकांच्या गोळीबारात हेड कॉन्स्टेबल सावळाराम विश्­नोई आणि हेड कॉन्स्टेबल शिशुपाल सिंह या दोन भारतीय जवानांसह, दोन नागरिक आणि एक मोरोक्कोचा जवान यांचा मृत्यू झाला.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या