29.8 C
Latur
Saturday, December 3, 2022
Homeआंतरराष्ट्रीयअंतर्वस्त्र घालावीच लागतील; पाक एअर लाइन्सच्या सूचना

अंतर्वस्त्र घालावीच लागतील; पाक एअर लाइन्सच्या सूचना

एकमत ऑनलाईन

इस्लामाबाद : इराणमध्ये सक्तीच्या हिजाबविरोधात सुरू असलेल्या महिलांच्या आंदोलनादरम्यान पाकिस्तानमधील एअर होस्टेसबद्दल धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाकिस्तान एअर लाइन्सने एअर होस्टेसला अंतर्वस्त्र परिधान करण्याची सक्ती केली आहे.

पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्स ‘पीआयए’ने त्यांच्या क्रू मेंबर्सना साधे कपडे घालण्याबरोबरच अंडरगारमेंट्स घालणे बंधनकारक केले आहे. पाकिस्तानच्या नॅशनल एअर लाईन्सचे जनरल मॅनेजर अमीर बशीर यांनी एअरलाईन्सच्या एअर होस्टेसच्या ड्रेसिंगवर आक्षेप घेतला. यानंतर एअर होस्टेसच्या ड्रेस कोडबाबत नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत.

बशीर यांनी सांगितले की, पाकिस्तानी एअर होस्टेसने एअरलाइन्सच्या कार्यालयात जाताना, हॉटेलमध्ये राहताना आणि इतर शहरांमध्ये प्रवास करताना चुकीचे कपडे परिधान केल्याच्या तक्रारी आल्या होत्या. योग्य पोशाख न घातल्याने पीआयएची प्रतिमा डागाळत आहे. याच कारणामुळे येथून पुढे महिला कर्मचा-यांच्या ड्रेसवर लक्ष ठेवण्यात येणार असून, पारदर्शक कपडे परिधान केल्यास अंतर्वस्त्र घालण्याची सक्ती करण्यात आली आहे. यामुळे संबंधित कर्मचा-यांचे कपडे आक्षेपार्ह दिसणार नाही.

पाकिस्तान एअर लाईन्सचा हा निर्णय त्यावेळी आला आहे. जेव्हा इराणमध्ये हिजाब वाद सुरू आहेत. महिला फ्लाइट अटेंडंटच्या ड्रेसवरून कोणताही वाद नव्याने उद्भवू नये या अशाप्रकारची मार्गदर्शक तत्त्वे घोषित केल्याचे मानले जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या