29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeआंतरराष्ट्रीयअमेरिकेचा सीरीयावर हवाई हल्ला

अमेरिकेचा सीरीयावर हवाई हल्ला

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : मागील आठवड्यामध्ये अमेरिकन हवाई दलाने सीरियामध्ये केलेल्या हल्ल्यामध्ये अल-कायदाचे सात वरिष्ठ नेत्यांना ठार केल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. अल कायदाचे नेते इदबिलजवळ एका बैठकीसाठी भेटलेले असतानाच हल्ला करण्यात आल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. या हल्ल्यामध्ये संघटनेचे ५० हून अधिक सदस्य ठार झाल्याचेही सांगण्यात येत आहे. अमेरिकेतील सेंट्रल कमांडचे प्रवक्ते मेजर बेथ रिऑर्डन यांनी दिलेल्या माहितीनुसार अमेरिकेने २२ ऑक्टोबर रोजी हा हवाई हल्ला केला. मात्र या हल्ल्यामध्ये अल-कायदाचे नक्की कोणते नेते मारले गेले त्यांची नावे जाहीर करण्यात आलेली नसल्याचे असोसिएट प्रेसने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

अल-कायदाच्या बड्या नेत्यांचा खात्मा करण्यात आल्याने या दहशतवादी संघटनेच्या नियोजनाची आणि जगभरामध्ये हल्ले करण्याची शक्ती नक्कीच कमी झाली आहे, असेही रिऑर्डन यांनी स्पष्ट केले. अल-कायदा वायव्य सीरियामधील अस्थिरतेचा फायदा घेत दहशतवादी कारवाया करण्यासाठी येथे तळ निर्माण करुन डावपेच आखतात. त्यामुळेच आम्ही आमचे सहका-यांच्या मदतीने आम्ही अल-कायदा आणि अन्य दहशतवादी संघटनांवर हल्ले करत राहणार आहोत, असे रिऑर्डन यांनी सांगितले.

रशियाच्या पाठिंब्याने हल्लाचा दावा
टर्कीचे समर्थन असणा-या विरोधी पक्षाचे प्रवक्ते युसूफ हमूद यांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी करण्यात आलेले हवाई हल्ले हे रशियाच्या पाठिंब्याने करण्यात आले आहेत. रशियाने यासंदर्भात कोणतीही माहिती दिलेली नाही. इदबिलमधील फैलाक अल शामद्वारे चालवण्यात येणा-या प्रशिक्षण केंद्रांवर हल्ला करण्यात आल्याची माहिती हमूद यांनी दिली आहे. फैलाक अल शाम हा विरोधकांच्या मोठ्या संघटनांपैकी एक आहे. टर्की मागील ब-याच काळापासून सीरियामधील विरोधी गटांना समर्थन देत आहेत. याच संघटनेतील तरुणांचा टर्कीने लीबिया आणि आजरबैजानमध्ये वापर केला आहे.

७८ जण ठार झाल्याची माहिती
सीरियामधील युद्धावर लक्ष ठेऊन असणारे ब्रिटनमधील सीरियन ऑब्झरव्हेट्री फॉर ूमन राइट्सने या हल्लामध्ये ७८ जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे. तर एकूण ९० जण जखमी झाले आहेत. हवाई हल्ला करण्यात आलेल्या प्रदेशामध्ये मदतकार्य सुरु आहे. रशियाने हा हल्ला केल्याची शक्यता अल-कायदानेही व्यक्त केली आहे. रशिया सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर असद यांचा समर्थक आहे.

चीनमध्ये पुन्हा कोरोनाची लाट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या