26.4 C
Latur
Friday, May 20, 2022
Homeआंतरराष्ट्रीयअमेरिका, ब्रिटनचे सैन्य आशिया खंडात?

अमेरिका, ब्रिटनचे सैन्य आशिया खंडात?

एकमत ऑनलाईन

चीनविरूध्द युध्दाची तयारी, सरावास सुरूवात
ब्रिटनने केले हजारो सैन्य स्वेज कालव्याजवळ तैनात

लंडन: चीनच्या वाढत्या आक्रमक विस्तारवादी धोरणामुळे आशिया-पॅसिफिक भागात युद्धाजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. चीनच्या दादागिरीला उत्तर देण्यासाठी अमेरिका आणि ब्रिटन आपल्या सैन्यांची संख्या आशिया खंडात वाढवणार आहे. इंडो-पॅसिफिक भागात आपले सैनिकी वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न अमेरिका करत असून, शीत युद्धानंतर अमेरिकेसाठी ही आव्हानात्मक परिस्थिती असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे या सैन्य तैनातीच्या जोरावर अमेरिकेला आपला दबदबा पुन्हा निर्माण करायचा असल्याची चर्चा आहे.

ब्रिटननेदेखील आपले हजारो सैन्य स्वेज कालव्याजवळ तैनात केले आहेत. जर्मनीत असलेले आपले हजारो सैन्य अमेरिका आशिया खंडात तैनात करणार आहे. अमेरिकेचे हे सैन्य गुआम, हवाई, अलास्का, जपान आणि आॅस्ट्रेलियातील लष्करी तळावर तैनात केले जाणार आहे. जपानच्या निक्केई एशियन रिव्ह्यूच्या वृत्तानुसार, अमेरिकेने आपल्या प्राथमिकतेत बदल केला आहे. शीत युद्धाच्या काळात सोव्हिएत रशियाविरोधात अमेरिकेने युरोपीयन देशांमध्ये आपले सैन्य तैनात केले होते.

अमेरिकेने २००० च्या सुमारास आपले लक्ष दहशतवादी संघटनांवर केंद्रीत केले होते. त्यातूनच अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये तालिबान आणि अल कायदाविरोधात युद्ध केले. त्यानंतर इराकसोबत युद्ध केले. त्यानंतर आता अमेरिकेने संभाव्य धोका म्हणून चीनवर लक्ष केंद्रीत केले आहे. चीन आणि रशियासारख्या दोन देशांसोबत सामना करण्यासाठी पूर्वीच्या तुलनेत अधिक अमेरिकन सैन्याला तैनात करण्याची आवश्यकता असल्याचे मत ट्रम्प यांचे राष्ट्रीय संरक्षण सल्लागार रॉबर्ट ओ ब्रायन यांनी व्यक्त केले होते. त्यानंतर अमेरिकेने आता आशिया-पॅसिफिक भागात आपले सैन्य बळ वाढवण्यावर लक्ष केंद्रीत केले आहे.

अमेरिकेच्या सैन्य तैनातीत बदल
विश्लेषकांच्या मते अमेरिकेच्या सैन्य तैनातीत बदल झाला आहे. अमेरिकेने आता युरोप आणि पश्चिम आशियाऐवजी आशिया-पॅसिफिक भागावर लक्ष केंद्रीत केले आहे. दुसरें म्हणजे जमिनीवरील लढाईऐवजी अमेरिकेने समुद्र आणि हवाई लढाईवर लक्ष केंद्रीत केले आहे. तिसरे म्हणजे ट्रम्प प्रशासनाला आपला लष्करावरील खर्च कमी करायचा आहे. तेल विहिरींसाठी अमेरिकेने पश्चिम आशियात आपले सैन्य तैनात केले होते. त्यानंतर आता तेलाचे साठे अमेरिकेतही आढळल्यामुळे तेथील सैन्य हटवण्यावर ट्रम्प प्रशासन विचार करत असल्याचे विश्लेषकांनी म्हटले आहे.

मागील काही काळापासून अमेरिका आणि चीनचे वाद सुरू असून, चीन आपल्या समोरील आव्हान असल्याची कल्पना अमेरिकेला आहे. त्यामुळे चीनचे आव्हान मोडीत काढण्यासाठी अमेरिका आता हवाई आणि समुद्र लढाईवर लक्ष्य केंद्रीत करत आहे.

चीनभोवती फास आवळण्याचे उद्दिष्ट
चीनच्या संभाव्य युद्धाच्या आव्हानाला तोंड देण्यासाठी अमेरिकेचा मित्र देश ब्रिटनदेखील आशिया खंडात आपले सैन्य वाढवत आहे. आशियाई मित्र देशांच्या मदतीने स्वेज कालव्याजवळ अधिक सैन्य तैनात करून चीनभोवती फास आवळता येऊ शकतो, असा ब्रिटनचा कयास आहे. कोरोनाच्या संकटानंतर जगात आर्थिक संकट, वाद आणि युद्ध होण्यााची भीती ब्रिटनचे संरक्षण मंत्री बेन वालेस यांनी व्यक्त केली होती. ब्रिटनही आता जपान व तैवानसोबत आपले संबंध अधिक मजबूत करण्यावर जोर देत आहे. स्वेज कालव्याजवळ ब्रिटनचे हजारो सैन्य कायमस्वरूपी असणार आहे. या कालव्याच्या मार्गाचा वापर चीन आपल्या व्यापारासाठी करतो.

अमेरिकी ११ विमानांचा चीनला चोहोबाजूने घेराव
दक्षिण चीन समुद्रामध्ये अमेरिकेने युध्दाभ्यास सुरू केला असून, अमेरिकन नौदलानेही ड्रॅगनच्या मुसक्या आवळण्याचे चांगलेच प्रदर्शन केले आहे़ चीनच्या धमकीनंतरही अमेरिकेच्या ११ लढाऊ विमानांनी दक्षिण चीन समुद्राच्या वादग्रस्त भागावर उड्डाण केले आहे़ दरम्यान, हा सराव चिनी सैन्य केवळ पाहतच राहले.

Read More  उस्मानाबादेत कायद्याचे उल्लंघन करणा-या ८० जणांना दणका

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या