29.5 C
Latur
Tuesday, March 28, 2023
Homeआंतरराष्ट्रीययूएस-चीनची विमाने आमनेसामने

यूएस-चीनची विमाने आमनेसामने

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : चीनच्या जे-११ फायटर जेटने दक्षिण-चीन समुद्रावर अमेरिकेच्या नौदलाच्या विमानाला रोखले. अमेरिकन जेट पॅरासेल बेटांपासून सुमारे ३० मैलांवर होते. या वादग्रस्त बेटावर १३० छोटी बेटे आहेत. यापैकी चीनचा लष्करी तळ सर्वात मोठा आहे. अमेरिकेचे पी-८ पोसायडन पेट्रोलिंग एअरक्राफ्ट दक्षिण-चीन समुद्रावरून उड्डाण करत होते.

तेव्हा त्याच्यासमोर एक चिनी फायटर जेट दिसले. अमेरिकेच्या विमानात बसलेल्या उठठच्या रिपोर्टरने सांगितले की त्याने विमानातील रेडिओवर धोक्याचा इशारा ऐकला. ग्राउंड स्टेशनवरून चिनी वायुसेनेने सांगितले-अमेरिकन विमान, चिनी एअरस्पेसपासून फक्त २२ किलोमीटरवर आहे. जर तुम्ही पुढे आलात तर होणा-या परिणामांवर तुम्हीच जबाबदार असणार.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या