34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeआंतरराष्ट्रीयअमेरिकेचा सौदी अरेबियाला दणका

अमेरिकेचा सौदी अरेबियाला दणका

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : मूळचे सौदी अरेबियाचे असलेले आणि ‘वॉंिशग्टन पोस्ट’चे स्तंभलेखक करणार पत्रकार जमाल खाशोगी यांच्या हत्या प्रकरणात गुप्तचर यंत्रणांनी धक्कादायक खुलासा केल्यानंतर अमेरिकेने सौदी अरेबियाविरोधात कठोर पावलं उचलली आहेत. खाशोगी यांची हत्या करण्याच्या कटाला सौदीचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांनीच परवानगी दिली होती, असे गुप्तचर यंत्रणांनी अहवालात म्हटले असून, बायडेन प्रशासनाने सौदीवर काही निर्बंध लादत, नागरिकांच्या व्हिसा बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

पत्रकार जमाल खाशोगी यांची २ ऑक्टोबर २०१८ मध्ये इस्तंबूल येथील सौदी अरेबियाच्या दूतावासात हत्या करण्यात आली होती. घटनेत सुरुवातीला मौन धरलं होतं. मात्र, त्यांची दूतावासात हत्या झाल्याचं नंतर समोर आलं होतं. या घटनेसंदर्भात अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणांनी आता धक्कादायक खुलासा केला आहे. सौदीचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांच्या परवानगीनेच खाशोगी यांची हत्या करण्यात आली होती, असे अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने आपल्या अहवालात म्हटले आहे. सौदी अरेबियाचे राजकुमार मोहम्मद बिन सलमान यांनी पत्रकार जमाल खाशोगी यांना पकडण्यासाठी वा ठार मारण्यासाठी इस्तंबुल, टर्कीमध्ये आॅपरेशन राबवण्यास मंजूरी दिली होती, असे अमेरिकन गुप्तचर यंत्रणेने अहवालात म्हटले आहे़

अठरा तासांत तब्बल २५.२४ किलोमीटरचा महामार्ग; ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’साठी प्रस्ताव

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या