24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeआंतरराष्ट्रीयतैवानच्या संरक्षणासाठी अमेरिकन सैन्य सज्ज

तैवानच्या संरक्षणासाठी अमेरिकन सैन्य सज्ज

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : चीन आणि तैवानमध्ये तणावाची स्थिती असताना दुसरीकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. तैवानवर हल्ला झाल्यास अमेरिकन सैन्य त्यांचे संरक्षण करेल अशी स्पष्ट भूमिका व्यक्त करत बायडेन यांनी चीनला इशारा दिला आहे. एका मुलाखतीत बायडेन यांनी तैवानच्या संरक्षणासाठी अमेरिकासोबत असल्याचे स्पष्ट केले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना मुलाखतीत तैवानबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. तैवानच्या संरक्षणासाठी अमेरिकन सैन्य प्रयत्न करणार का, असे विचारले असता त्यांनी होय असे उत्तर दिले. तैवानवर अभूतपूर्व हल्ला झाल्यास अमेरिका त्यांचे संरक्षण करेल असे बायडेन यांनी म्हटले. तैवानबाबत राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अलिकडच्या काळात घेतलेली ही स्पष्ट भूमिका असल्याचे म्हटले जात आहे. तैवानच्या पाठिशी उभे राहण्याची भूमिका अमेरिकेची आहे. मात्र, बायडन यांनी त्यावर आता अधिकच स्पष्ट भूमिका घेतली आहे. यामध्ये आता, अमेरिकन सैन्य तैवानच्या भूमीवर उतरू शकतात, यावर भूमिका घेतली आहे. व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनीदेखील अमेरिकेचे तैवानबाबत असलेल्या धोरणात कोणताही बदल झाला नसल्याचे स्पष्ट केले.

वन चायना पॉलिसीवर भाष्य नाही
बायडेन सध्या ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या अंत्यसंस्काराच्या सोहळ्यासाठी ब्रिटनमध्ये आहेत. बायडन यांनी मागील आठवड्यात सीबीएसला मुलाखत दिली होती. जवळपास ६० मिनिटांच्या मुलाखतीत बायडन यांनी तैवानचे स्वातंत्र्य, वन चायना पॉलिसी या बाबत कोणतेही भाष्य केले नाही.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या