35.2 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeआंतरराष्ट्रीयभविष्यातील युद्धासाठी अमेरिकेचे ‘रोबोट डॉग’

भविष्यातील युद्धासाठी अमेरिकेचे ‘रोबोट डॉग’

एकमत ऑनलाईन

न्युयॉर्क : अमेरिकेच्या सैन्याने भविष्यातील युद्धाच्या स्वरुपाच्या दृष्टिकोनातून व्युहरचनांना सुरुवात केली आहे. नुकतेच अमेरिकेच्या हवाईदलाकडून यासंदर्भात झालेल्या युद्धाभ्यासात रोबोट डॉगचा वापर करण्यात आला. आर्टिफिशियल इंटलिजन्स (ए.आय.) तंत्रज्ञानावर आधारित या रोबोट डॉग्जच्या युद्धाभ्यासाचे व्हिडिओ सध्या अमेरिकेत व्हायरल होत आहेत.

काही दिवसांपुर्वी नेवादा येथील हवाईतळांवर हा युद्धाभ्यास करण्यात आला. हवाईतळांची सुरक्षा व संभाव्य धोक्यांबाबत आगाऊ सुचना मिळून त्यांच्यावर वेळीच मात करता यावी यादृष्टिकोनातून या रोबोट डॉग्जचा अभ्यास करण्यात आला. आधुनिक युद्ध व्यवस्थापन प्रणालीअंतर्गत हा अभ्यास करण्यात आला. प्रणालीमध्ये आर्टिफिशियल इंटलिजन्स व डाटा अ‍ॅनालिसिसच्या सहाय्याने संभाव्य धोक्यांचा आगाऊ अंदाज घेता येणार आहे. भविष्यात युद्धातील विजयासाठी जेट इंधन, उपग्रहांच्या दिमतीला गुप्त सुचनांचा साठा हा सुद्धा महत्त्वाचा पैलू ठरणार आहे.

दुरस्थ नियंत्रण शक्य
रोबोट डॉगची निर्मिती फिलाडेल्फियाच्या घोस्ट रोबोटिक्स या संस्थेने केली आहे. पाय असलेल्या अन्य प्रकारच्या रोबोट किंवा चाके असलेल्या रोबोटपेक्षा रोबोट डॉगच्या कार्यान्वयन सोपे आहे. त्याच्या कार्यान्वयनात जास्त समस्या नाहीत. रोबोट डॉगना फार लांबूनही कार्यान्वयित करता येते, असा दावा संस्थेने केला आहे.

सैनिकांच्या प्रत्येक मोहिमेत महत्त्वाचा साथी
अतिरेक्यांचा खात्मा, शत्रुवर अचानक हल्ला अशा साहसी मोहिमा पुष्कळदा सैन्याला कराव्या लागतात. अशा मोहिमांमध्ये आपल्या हालचालींचा सुगावा शत्रुला बिलकुल लागणार नाही याची अत्यंत दक्षता घेणे मोहिमेच्या यशासाइी अत्यंत गरजेचे असते. अशावेळी सैनिकांचा जीव मोठ्या संकटात असतो. मात्र रोबोट डॉगमुळे हे टाळता येईल. ज्या ठिकाणी मोहिम नियोजित केली असेल अशा ठिकाणी प्रथम अशा रोबोट डॉगल पाठवून परिस्थितीचा अंदाज घेता येऊ शकतो. उंचसखल जमीन, डोंगरीभागातही ते उपयोगी ठरु शकतात. अशा रोबोट डॉगमुळे आम्हाला भविष्यात साहसी मोहिमा व युद्धात फायदा होईल, असे प्रतिपादन अमेरिकेच्या अंतराळ मोहिम पथकाचे प्रमुख जॉन रेमंड यांनी केले.

शिरूर अनंतपाळ तालुक्यात ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी’ मोहीम

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या