30.5 C
Latur
Monday, March 1, 2021
Home आंतरराष्ट्रीय नव्या क्षेपणास्त्रावर अमेरिकेचा ७ लाख कोटींचा खर्च

नव्या क्षेपणास्त्रावर अमेरिकेचा ७ लाख कोटींचा खर्च

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : चीन आणि अमेरिकेपाठोपाठ आता चीन आणि रशियामध्ये तणाव वाढत चाललेला असताना अमेरिका एका महासंहारक अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रावर १०० अब्ज डॉलर (७ लाख कोटी रुपये) खर्च करत आहे. दुसºया महायुद्धात जपानच्या हिरोशिमावर टाकण्यात आलेल्या अणुबॉम्बपेक्षा अमेरिकेच्या या क्षेपणास्त्राची क्षमता २० पटींनी अधिक आहे. अमेरिकेतून बसल्या जागेवरून चीनमधील बीजिंग महानगर पापणी लवताच होत्याचे नव्हते करण्याची ताकद या क्षेपणास्त्रात आहे.

अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त गाईडेड सिस्टीममुळे (मार्गदर्शक यंत्रणा) १० हजार किलोमीटरचा पल्ला गाठल्यानंतरही आपल्या लक्ष्यावर अचूक मारा करू शकते. अमेरिकन हवाई दलाने गतवर्षी ८ सप्टेंबर रोजी एका अमेरिकन शस्त्रास्त्रे उत्पादक कंपनीसोबत (नॉथ्रॉप ग्रुम्मन) १३.३ अब्ज डॉलरचा एक करार केला होता. या क्षेपणास्त्रासाठीचा सुरुवातीचा हा खर्च होता. हे क्षेपणास्त्र २०२९ पर्यंत पूर्णत्वास येईल आणि अमेरिकन हवाई दलाच्या ताफ्यात समाविष्ट होईल, असे ‘ब्लूमबर्ग’ आणि ‘आर्म्स कंट्रोल असोसिएशन’ने आपल्या अहवालात म्हटलेले आहे.

जुनाट झालेल्या ‘मिनिटमॅन ३’ क्षेपणास्त्रांच्या बदल्यात ही नवी अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रे अमेरिकन हवाई दलाचा घटक होतील. आंतरखंडीय श्रेणीचे हे क्षेपणास्त्र असल्याने जमिनीच्या आत त्यासाठी एक गोपनीय ठिकाण बनवून तेथे ते तैनात केले जाईल. इथून जगाच्या कुठल्याही कोर्प­यावर हल्ला करता येईल. क्षेपणास्त्राचे नामकरण अद्याप झालेले नाही.

अमेरिकेचे धोरण काय?
अमेरिकन धोरणानुसार अण्वस्त्रे केवळ बचावासाठी नाहीत. शत्रू राष्ट्र अमेरिकेवर हल्ल्याच्या योजनेत आहे, हे कळले तरी अमेरिका अशा राष्ट्रावर अण्वस्त्र हल्ला करू शकते. अमेरिकेच्या ताफ्यात ३ हजार ८०० हून अधिक अणुबॉम्ब आणि अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रे आहेत. १७५० बॉम्ब कोणत्याही क्षणी अण्वस्त्रवाहू क्षेपणास्त्रे आणि लढाऊ विमानांसह तत्पर आहेत. यापैकी १५० अणुबॉम्ब युरोपात तैनात आहेत, जेणेकरून रशियावर लक्ष ठेवता यावे.

भारताचे धोरण काय?
भारताच्या ताफ्यात १३० ते १४० आणि पाकिस्तानच्या ताफ्यात १५० ते १६० अण्वस्त्रे आहेत. अर्थात भारताच्या ताफ्यातील बॉम्ब अधिक परिणामकारक आहेत. चीन आणि पाकिस्तानसोबत सीमेवरून वाद सुरू असूनही अण्वस्त्र हल्ल्याची सुरुवात आमच्याकडून होणार नाही, असे भारताने स्पष्ट केलेले आहे. भारताचे हेच धोरणही आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,438FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या