24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeआंतरराष्ट्रीयअमेरिकेकडून युक्रेनला शस्त्रास्त्रे पुरवठा

अमेरिकेकडून युक्रेनला शस्त्रास्त्रे पुरवठा

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : युक्रेनला अत्याधुनिक मध्यम श्रेणी रॉकेट प्रणाली पाठविण्याचा निर्णय अमेरिकेने घेतला आहे. अध्यक्ष जो बायडेन प्रशासनाने मंगळवारी हा निर्णय जाहीर केला होता दरम्यान आता पुरवठा करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.
युक्रेनच्या दोन्बस प्रदेश ताब्यात घेण्याचे रशियाचे प्रयत्न रोखण्यासाठी युक्रेनची धडपड सुरू आहे. अमेरिकेचा हा निर्णय म्हणजे आगीत तेल ओतण्याचा प्रकार असल्याची टीका रशियाने केली आहे.

दोन वरिष्ठ अधिका-यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले, की युक्रेनच्या संरक्षण सहाय्यासाठी अमेरिकेने मंजूर केलेल्या ७० कोटी डॉलरच्या मदतीचा भाग म्हणून हेलिकॉप्टर, रणगाडाविरोधी शस्त्र प्रणाली, अत्याधुनिक क्षेपणास्त्र-रॉकेट प्रणाली पुरवली जाणार आहे. प्रशासनाकडून लवकरच याबाबत अधिकृत घोषणा करण्यात येईल. अध्यक्ष बायडेन यांनी सोमवारी सांगितले होते, की आम्ही युक्रेनला रशियाला लक्ष्य करणारी लांब पल्ल्याची रॉकेट यंत्रणा पाठवत नाही. रशियाच्या सुरक्षा परिषदेचे उपप्रमुख दिमित्री मेदवेदेव यानी या निर्णयाचे स्वागत केले होते.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या