24.8 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeआंतरराष्ट्रीयअमेरिका रशियन तेलावर किंमत मर्यादा आणणार

अमेरिका रशियन तेलावर किंमत मर्यादा आणणार

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांना आर्थिक क्षेत्रात झटका देण्याच्यासाठी अमेरिका जी ७ देशांना सोबत घेवून एक मोठी योजना आखत आहे. अमेरिकेने सांगितले की जी ७ देशांनी जाहीर केलेल्या, रशियन तेलावर किंमत मर्यादा लादण्याच्या निर्णयाची त्वरीत अंमलबजावणी करून, आम्ही पुतीन यांच्या मनमानीला आळा घालू. व्हाईट हाउसचे प्रेस सचिव करेन जीन म्हणाले रशियन तेलावर किंमत मर्यादा लावने हे एक शक्तिशाली साधन आहे.

कारण यामुळे जागतिक ऊर्जा किंमती घट होईल, आणि जागतिक स्तरावर ग्राहकांना फायदा होईल. त्याच वेळी, यापूर्वी जी ७ च्या अर्थमंत्र्यांची याच मुद्यांवर बैठक झाली, आणि त्यांनी सांगितले की आमच्या निर्णयामुळे युक्रेनमध्ये क्रूर युद्ध करणा-या रशियाच्या महसुलावर दबाव येईल. दरम्यान अमेरिकेचे म्हणणे आहे की भारता सोबत काही देशांनी रशियन तेल खरेदी वाढविली आहे. हे पाहता रशियाकडून येणारे तेलावर किंमत ठरवली गेली पाहिजे. या निर्णयामुळे रशियावर आर्थिक बोजा वाढणार असला तरी त्याचा फायदा जागतिक स्तरावर ग्राहकांना होणार आहे.

अमेरिकेला मिळवायचे वर्चस्व
अमेरिका जी ७ देशांच्या नावाखाली तेलाच्या निर्यातीत जागतिक वर्चस्व मिळवायचे आहे. जी ७ देशांनी सांगितले की ते या निर्णयाला ठोस स्वरूप देण्यासाठी सर्वसमावेशक युतीच्या दिशेने काम करत आहेत. परंतु फ्रान्समधील अधिका-यांनी थांबवण्याचे आवाहन करून सांगितले की, अंतिम निर्णय २७ सदस्यांनी संमती दिली असेल तरच घेतला जाऊ शकतो. आम्ही आमच्या निर्णयावर ठाम असलो तरी जी ७, कॅनडा, फ्रान्स, इटली, जपानमधील यू.के. आणि युनायटेड स्टेट्स सहभागी आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या