23.7 C
Latur
Thursday, August 11, 2022
Homeआंतरराष्ट्रीयअमेरिका युक्रेनला शस्त्रसामग्री देणार

अमेरिका युक्रेनला शस्त्रसामग्री देणार

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : युक्रेनला ८२ कोटी डॉलरची नवी शस्त्रसामुग्री देण्याची घोषणा अमेरिकेने केली. रशियाच्या दीर्घ पल्ल्याच्या हवाई हल्ल्यांना तोंड देण्यासाठी पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी नवी क्षेपणास्त्र प्रणाली व तोफखाना रडारचा यामध्ये समावेश आहे.

रशियाने अलीकडच्या काही दिवसांत युक्रेनवर डझनभर क्षेपणास्त्रे डागली. तसेच एकाच वेळी काही तास सतत गोळीबार करून युक्रेनच्या सैन्याचा पाडाव केला. साधनसामुग्री व मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी आणखी दारूगोळा व अत्याधुनिक प्रणालीची मदत लवकरात लवकर करण्याचे जाहीर आवाहन युक्रेनी नेत्यांनी पाश्चिमात्य देशांना केले होते.

युक्रेनला मदत करण्यासाठी ८.८ अब्ज डॉलरची शस्त्रास्त्रे व सैनिकी प्रशिक्षण देण्यास अमेरिका कटिबद्ध असून सात अब्ज डॉलरची मदत रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर जाहीर केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या