21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeआंतरराष्ट्रीयब्रिटनमध्ये पुढील आठवड्यापासून लसीकरण

ब्रिटनमध्ये पुढील आठवड्यापासून लसीकरण

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : जगाला वेठीस धरणा-या कोरोना संकटावर मात करण्यासाठी सगळीकडेच युद्धपातळीवर लस निर्मितीचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच एका आनंदवार्ता समोर आली आहे. ब्रिटनने फायझर बायोएनटेकच्या लसीला मंजुरी दिली आहे. अमेरिका आणि युरोपीय देशांनी कोणता निर्णय घेण्याच्या अगोदरच लसीला मंजुरी देणारा ब्रिटन जगातला पहिला देश ठरला असून या देशात पुढच्या आठवड्यापासून प्रत्यक्ष लसीकरणाच्या प्रक्रियेला सुरूवात केली जाणार आहे.

कोविड-१९ च्या प्रतिबंधासाठी फायझर अणि बायोएनटेक या जागतिक पातळीवरील औषध निर्मिती करणा-या कंपन्यांनी विकसित केलेल्या लसीची परिणामकारकता ९५ टक्के असल्याचे दिसून आले आहे. बीएनटी१६२बी२, या लसीच्या तिस-या टप्प्यातील चाचणीचा अहवालही प्रसिद्ध करण्यात आला होता. या चाचणीमध्ये प्राथमिक अपेक्षित परिणाम साध्य होत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

या दोन्ही कंपन्यांनी या वर्षभरात जगभरासाठी लसीचे ५ कोटी डोसचे तर २०२१ च्या अखेरीपर्यंत १.३ अब्ज डोसचे उत्पादन करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. दरम्यान, अमेरिकेतील मॉडर्ना कंपनीनेही विकसित केलेली कोरोनाविरोधी लस ९४़५ टक्के परिणामकारक असल्याचा दावा केला आहे.

दाऊदची मालमत्ता १.१० कोटींना विकत घेतली

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या