जेरुसलेम : इस्रायलमध्ये २७ डिसेंबरपासून कोरोनापासून बचावासाठी नागरिकांचे लसीकरण केले जाणार आहे, अशी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी घोषणा केली आहे. तत्पूर्वी, नेतन्याहून यांनी फायझर कंपनीची लस इस्रायलमध्ये दाखल झाली असल्याची माहिती दिली होती. तसेच ही सेलिब्रेशन करण्याची वेळ असल्याचे नेतन्याहू म्हणाले होते. नेतन्याहू म्हणाले होते की, माझा या लसीवर पूर्ण विश्वास असून येत्या काळात या लसीला मंजुरी मिळेल, असे मला वाटते.
नेतन्याहू म्हणाले की, मला आपल्या देशात लसीकरण करुन घेणारी पहिली व्यक्ती व्हायचे आहे. जेणेकरुन लोकांसमोर एक उदाहरण तयार होईल, तसेच लोकांचा या लसीवरील विश्वास वाढेल. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, २७ डिसेंबरपासून लसीकरणाला सुरुवात होईल. त्यानंतर दरदिवशी तब्बल ६० हजार लोकांना लस दिली जाईल. आपल्या देशाची लोकसंख्या ९० लाख इतकी आहे. त्यामुळे काही महिन्यांमध्ये आपल्याकडे लसीकरण पूर्ण होईल.
लातूरच्या नूतन जिल्ह्याधिकाऱ्यानी पदभार स्वीकारला