29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeआंतरराष्ट्रीयलसीकरण हाच प्रभावी उपाय

लसीकरण हाच प्रभावी उपाय

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : जगभरात कोरोनाचे जे संकट निर्माण झाले आहे ते यापुढील काळातही बरीच वर्ष कायम राहणार आहे. या पार्श्वभूमीवर जगातील सर्व देशांमध्ये कोरोना लसीचा सुरक्षित आणि सुरळीत पुरवठा होणे आणि व्यवस्थीत लसीकरण होणे हेच महत्वाचे आहे, असे जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. दोन्ही संस्थांच्या प्रतिनिधींची नुकतीच एक संयुक्त बैठक घेण्यात आलीे.

त्यात जगभरातील कोरोनाची स्थिती आणि त्याचे अर्थकारणावर होणारे परिणाम याचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर प्रसिद्धीला देण्यात आलेल्या एका संयुक्त निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. जगभरातील गरजूंना समान आणि पुरेशा प्रमाणात लसीचा पुरवठा होण्याची गरज असून, त्यासाठी व्यापक स्तरावर समन्वयाची गरज आहे असेही त्यात नमूद करण्यात आले आहे.

कोरोनामुळे जागतिक अर्थकारणावरही विपरित परिणाम होत असून, त्यामुळे जगातील दारिद्रय, असमानता वाढत असून विकाची गतीही उलटी फिरत आहे. हा भाग लक्षात घेतला तर त्याच्यावरही संयुक्तपणे प्रयत्न हाती घेण्याची गरजही व्यक्त करण्यात आली आहे.

काश्मीरमधील चकमकींत आठ दहशतवादी ठार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या