वुहान : जगभरात कोरोना लसीची वाट पाहण्यात येत आहे. येत्या काही महिन्यात करोनाची लस येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या सर्व घडामोडीत अमेरिकेतील काही तज्ज्ञांनी चीनवर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. दक्षिण कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना चीनने करोना लस पुरवली आहे, असा दावा अमेरिकेच्या विश्लेषकांनी केला आहे.
वॉशिंग्टनमधील राष्ट्रीय थिंक टँक केंद्रांतील दक्षिण कोरियाचे अभ्यासक हॅरी कझिअनीस यांनी हा दावा केला आहे. चीनने किम जोंग उन व वरिष्ठ अधिका-यांचे लसीकरण करण्यात आल्याचे म्हटले आहे. प्रायोगिक तत्वावर असलेली करोनाची लस चीनने किम जोंग उन व त्यांच्या कुटुबीयांना पुरवल्याचा दावा हॅरी यांनी केला आहे. किम जोंग उन यांना पुरवण्यात आलेली ही लस सुरक्षित आहे का, याबद्दल माहिती कळालेली नाही.
त्याचबरोबर ही लस कोणत्या कंपनीने पुरवली ही माहितीही मिळू शकली नाही, असेही हॅरी यांनी म्हटले आहे. किम जोंग उन आणि त्यांचे कुटुंब, तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या व राजकीय वर्तुळात सक्रिय असणा-या इतर वरिष्ठ पदावरील अधिका-यांचे लसीकरण करण्यात आले आहे. मागील दोन तीन आठवड्यात हे लसीकरण करण्यात आले असून, चीन सरकारने ही लस पुरवली, असे हॅरी यांनी १९ फोर्टी फाईव्हसाठी लिहिलेल्या लेखात म्हटले आहे.