32 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeआंतरराष्ट्रीयअमेरिकेतील नव्या कोरोना विषाणूवर लसही निष्प्रभ?

अमेरिकेतील नव्या कोरोना विषाणूवर लसही निष्प्रभ?

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : कोरोना विषाणूच्या प्रसारासंदर्भात रोज नव्याने चिंता वाढवणारी माहिती समोर येत आहे. अमेरिकेमधील ओरिगॉन येथे ब्रिटनमधील नव्या प्रकारच्या कोरोना विषाणूचे बदलेले स्वरुप म्हणजेच म्युटेड व्हेरिएंट आढळून आला आहे. हा विषाणू ब्रिटनमधील विषाणूपेक्षा अधिक घातक असल्याचे सांगितले जात आहे. धक्कादायक बाब म्हणजे या विषाणूची रचना ही दोन वेगवेगळ्या विषाणूंमधील रचना एकत्र येत झाली आहे. त्यामुळे यावर कोरोनाच्या लसीचा फारसा परिणाम होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. आरोग्यतज्ज्ञांनी या विषाणूसंदर्भात सर्वांनीच अधिक सावध राहण्याची गरज आहे असे म्हटले आहे़ हा विषाणू वेगाने पसरण्याबरोबरच सतत त्यामध्ये बदल होत असल्याने यावर लस निष्प्रभ ठरेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे़

दोन वेगळ्या विषाणूंमधील रचनेपासून नव्याने तयार झालेली रचना असणा-या विषाणूचा संसर्ग झालेला एकच रुग्ण आढळून आला आहे. मात्र यासंदर्भात जेनेटिक्समधील तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार या विषाणूचा आधीपासूनच फैलाव सुरु झालाय. हा विषाणू एकाच रुग्णात तयार झालेला नाही. ओरिगॉन हेल्थ ऍण्ड सायन्स युनिव्हर्सिटीचे ब्रायन ओ रॉक यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा विषाणू जगातील इतर भागांमधून इथे आलेला नाही. तर अचानक या नव्या प्रकारच्या विषाणूचा शोध लागला आहे. रॉक आणि त्यांचे सहकारी या नव्या व्हेरिएंटची निर्मिती कशी झाली यासंदर्भात सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल ऍण्ड प्रिव्हेन्शनची मदत करत आहेत. संशोधनासंदर्भातील माहिती रॉक आणि त्यांच्या सहका-यांनी सरकारी संस्थांसोबत शेअर केली आहे.

ब्रिटनमध्ये आढळून आलेल्या बी वन वन वन सेव्हन या विषाणूचा वेगाने अमेरिकेमध्ये प्रादुर्भाव होताना दिसत आहे. सामान्य करोना विषाणूपेक्षा हा नवा विषाणू अधिक वेगाने पसरत असल्याचे सांगण्यात येत आहे. याच नव्या विषाणूमुळे येत्या काही दिवसांमध्ये अमेरिकेत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे़

विषाणूमध्ये सातत्याने बदल
ओरिगॉनमध्ये आढळून आलेल्या या नव्या प्रकारच्या विषाणूमध्येही म्युटेशन म्हणजेच बदल आढळून आला आहे. हा बदल दक्षिण आफ्रीका, ब्राझील आणि न्यूयॉर्क शहरामध्ये पसरणा-या कोरोनाच्या नव्या विषाणूमध्येही आढळून आला होता.दक्षिण आफ्रिकेमध्ये झालेल्या क्लीनिकल ट्रायल्समध्ये ईईके म्युटेशनमध्ये रोगप्रतिकारशक्तीला नुकसान पोहचत असल्याचे दिसून आले. हा विषाणू सध्याच्या कोरोना लसीचा प्रभाव कमी करतो असेही यात दिसून आले.

लसीचा प्रभाव कमी असणार?
कोरोनाची लस प्रभावशाली ठरणार असली तरी तिचा प्रभाव या नवीन विषाणूविरोधात तुलनेने कमी असेल. त्यामुळेच फाइजर-बायोएनटेक तसेच मॉडर्ना कंपनीने नव्या लसीच्या चाचण्याही सुरु केल्यात. ब्रिटनमधील ईईकेसोबत बी वन वन सेव्हनचे म्युटेशन दिसून आले आहे. हा बाब चिंताजनक असल्याचे संशोधक सांगत आहेत. डॉक्टरांच्या अंदाजानुसार ओरिगॉनमधील नवा विषाणू हा इथेच निर्माण झालेला आहे.

ग्रामीण महिलांना उद्योजक घडवण्यासाठी गुगलचा पुढाकार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या