24.9 C
Latur
Friday, January 28, 2022
Homeआंतरराष्ट्रीय‘जॉन्सन अँड जॉन्सन’कडून लवकरच युवकांवरही लशीच्या चाचण्या

‘जॉन्सन अँड जॉन्सन’कडून लवकरच युवकांवरही लशीच्या चाचण्या

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी अद्यापही जगभरात केवळ लसनिर्मिती हाच रामबाण उपाय असल्याचे सांगितले जात आहे. भारतासह जगभरात कोरोनार विरोधी लशींच्या चाचण्या सुरू असून, अमेरिकेतील जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने निर्माण केलेल्या लशीच्या तिसºया टप्प्यातील चाचण्या सुरू आहेत. लवकरच युवकांवरही चाचण्या करणार असल्याची माहिती कंपनीच्यावतीने देण्यात आली. त्यायिवाय कंपनी याच लशीच्या लहान मुलांवरही चाचण्या करणार असल्याचेही सांगण्यात आले. अमेरिकेत मॉर्डना, पीफायझर या कंपन्यांप्रमाणे जॉन्सन अँड जॉन्सनही कोरोना लशीवर संशोधन करत आहे.

मागील अनुभवांप्रमाणेच तंत्रज्ञानाचा वापर
जॉन्सन अँड जॉन्सनच्या लशीच्या तिस-या टप्प्यातील चाचण्या सध्या सुरू आहेत. १२ ते १८ वर्ष वयोगटातील मुलांवर कोरोना लशीची लवकरात लवकर चाचणी करण्याची जॉन्सन अँड जॉन्सनची योजना आहे. कंपनीच्या मागच्या अनुभवाप्रमाणे मुलांना दिल्या जाणा-या लशींमधील त्याच तंत्रज्ञानाचा उपयोग होऊ शकेल, असे कंपनीने म्हटले आहे.

अमेरिकेच्या रोग नियंत्रण आणि प्रतिबंधक केंद्राची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक झाली. बैठकीत जॉन्सन अँड जॉन्सनचे डॉ. जेरी सॅडोफ म्हणाले,‘जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर लहान मुलांवर चाचण्या करण्याची योजना आहे. पण त्या अत्यंत काळजीपूर्वक करण्यात येतील,सुरक्षितता आणि इतर गोष्टींवर हे अवलंबून असेल. या चाचण्या कधीपर्यंत केल्या जातील, याचा कालावधी मात्र सॅडोफ यांनी सांगितला नाही. यासंदर्भात औषध नियंत्रकाशी व कंपनीच्या भागादारांशी चर्चा सुरू असल्याचे सॅडोफ यांनी सांगितले. जॉन्सन अँड जॉन्सनने आपल्या लशीच्या तिसºया टप्प्यातील चाचण्यांना सप्टेंबरमध्ये सुरूवात केली होती. त्यानंतर एका स्वयंसेवकाची प्रकृती बिघडल्याने चाचण्या थांबवल्या होत्या. काही आठवड्यांपूर्वी त्या पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत.

सैनिकी शाळांमध्ये आता २७ टक्के आरक्षण

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,567FansLike
192FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या