28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeआंतरराष्ट्रीयकॅनडात १२ वर्षांच्या मुलांना मिळणार लस

कॅनडात १२ वर्षांच्या मुलांना मिळणार लस

एकमत ऑनलाईन

ओटावा : कॅनडामध्ये लवकरच १२ ते १५ वयोगटातील बालकांनाही कोरोनाची लस दिली जाणार असून, देशात या वयोगटातील बालकांना फायझर लस देण्यासाठी सरकारने मान्यता दिली आहे, अशी माहिती तिथल्या आरोग्य अधिकाºयांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. १२ वर्षांवरील बालकांच्या लसीकरणासाठी परवानगी देणारा कॅनडा हा जगातील पहिला देश आहे. याआधी १६ वर्ष आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना लसीकरणासाठी परवानगी होती.

एपीच्या अहवालानुसार, कॅनडाच्या मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. सुप्रिया शर्मा यांनी या निर्णयाला दुजोरा दिला आहे. त्या म्हणाल्या की, लसीकरणानंतर मुलांना पूर्वीसारखे सामान्य जीवन जगता येईल. सध्या अमेरिका आणि युरोपियन युनियनमध्ये या लसीच्या चाचण्या सुरू आहेत. या वयोगटासाठी ही लस सुरक्षित आणि प्रभावी असल्याचे पुराव्यांवरून दिसून आले आहे. कॅनडामध्ये मुलांसाठी मंजूर झालेली ही पहिली लस आहे, असे सुप्रिया शर्मांनी सांगितले.

अमेरिकेतही मान्यता मिळण्याची शक्यता
अमेरिकेचे अन्न व औषध प्रशासन पुढच्या आठवड्यात फायझर लसीला तरूणांसाठी परवानगी देण्याची शक्यता आहे. फायझरची लस ही तरुणांवरही प्रभावी असल्याचे काही आठवड्यांपूर्वी कंपनीला आढळले होते, मार्चमध्ये फायझरने १२-१५ या वयोगटातील २२६० स्वयंसेवकांवर झालेल्या चाचण्यांचे प्राथमिक निकाल जाहीर केले होते.

लसीचा दुसरा डोस देण्यात महाराष्ट्र अव्वल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या