वाशिंग्टन: वृत्तसंस्था
मिनिआपोलिस शहरात बनावट नोटाच्या वापराप्रकरणी जॉर्ज फ्लॉएडची पोलीस चौकशी करत होते. त्यावेळी पोलिसांसोबत वादावादी झाली. एका पोलिसाने जॉर्जच्या गळ्यावर गुडघा ठेवला होता. मला श्वास घेता येत नाही, असे जॉर्ज म्हणत असतानाही पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या या वर्णद्वेषी अत्याचाराविरोधात आंदोलन सुरू झाले.
अमेरिकेतील काही शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलने सुरू असून त्याला हिंसेचे वळण लागले आहे. जॉर्ज फ्लॉएड या कृष्णवर्णीयाला पोलिसांनी ताब्यात घेतले असताना मृत्यू झाल़ जॉर्जच्या मृत्यूचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर आंदोलने आणि हिंसाचाराचा आगडोंब अमेरिकेत उसळला. या आंदोलनाची धग थेट व्हाइट हाउसलाही जाणवण्यास सुरुवात झाली आहे. या आंदोलनाच्या परिणामी व्हाइट हाउस बंद करण्यात आले आहेत. मिनिआपोलिस शहरात बनावट नोटाच्या वापरा प्रकरणी जॉर्ज फ्लॉएडची पोलीस चौकशी करत होते. त्यावेळी पोलिसांसोबत वादावादी झाली. एका पोलिसाने जॉर्जच्या गळ्यावर गुडघा ठेवला होता. मला श्वास घेता येत नाही असे जॉर्ज म्हणत असतानाही पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या या वर्णद्वेषी अत्याचाराविरोधात आंदोलन सुरू झाले. हजारो जण रस्त्यावर उतरले. या आंदोलनाला हिंसक वळण लागले. पोलीस ठाण्यालाही आग लावण्यात आली.
मिनियापोलिसमध्ये तीव्र पडसाद
मिनियापोलिसमध्ये आंदोलकांनी गुरुवारी पोलिस स्टेशन जाळून टाकले होते. त्यानंतरही जाळपोळ सुरूच आहे. हिंसक जमावाला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, रबरी गोळ्यांचा मारा केला, तरीही जमाव नियंत्रणात आला नाही. दरम्यान, अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाने लष्कराला सूचना केल्या असून, लष्करी पोलिसांना मिनियापोलिसमध्ये जाण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना केल्या आहेत. उत्तर कॅरोलिना आणि न्यूयॉर्कमधील पोलिसांना आदेश दिल्यानंतर, चार तासांमध्ये तैनात होण्यासाठी सज्ज राहावेत, अशी सूचना करण्यात आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारीच लष्कर तैनात करण्याविषयीचे सुतोवाच केले होते.
जॉर्जला न्याय द्या म्हणून आंदोलन
मिनेसोटाच्या मिनियापोलिसमध्ये आंदोलनाला हिंसेचे वळण लागले. आंदोलन करणाºया एका गटाने काही वाहनांना आगी लावल्या. हिंसाचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेऊन सीक्रेट सर्व्हिस एजेंट्स आणि स्थानिक पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. फिनिक्स, डेनवर, लास वेगास, लॉस एंजिलिससह काही शहरांमध्ये हजारोंच्या संख्येने आंदोलनकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. जॉर्जच्या मृत्यूस कारणीभूत असणाºयांवर कारवाई करा, जॉर्जला न्याय द्या आदी मागण्यांचे फलक घेऊन हजारोजण रस्त्यावर उतरले आहेत.
हिंसाचाराचा आगडोंब, तोडफोड
कॅलिफोर्नियामधील काही भागामध्ये हिंसाचार उफाळून आला. कॅलिफोर्नियातील आॅकलंडमध्ये शांततेत आंदोलन सुरू असताना काही आंदोलक अचानक ंिहसक झाले आणि पोलिसांची कार तोडण्यास सुरुवात केली. एका कारला त्यांनी आग लावली. सीएनएनच्या मुख्यालयाच्या इमारतीवर स्प्रे पेटिंग करत आंदोलनाशी संबंधित मागण्या रेखाटल्या
Read More भारताने सर्वात आधी ‘कोरोना’वर लस शोधावी -लेखिका तसलिमा नसरीन
अधिकारी जखमी, अनेकजण ताब्यात
आंदोलनकर्त्यांनी युजीनमधील जेफरसन सेंटमधील वेस्ट ७ एवेन्यूत येणाºया रस्त्यावर जाळपोळ केली. अटलांटामध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या मुद्यावर पोलीस प्रवक्ते कार्लोस कॅम्पोस यांनी सांगितले की, या हिंसाचारात तीन अधिकारी जखमी झाले आहेत. तर, अनेक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. अमेरिकेतील आंदोलन सुरू असलेल्या शहरांमध्ये अशाच प्रकारचे चित्र आहे. लोकांमध्ये प्रचंड रोष दिसून येत आहे.
व्हाइट हाउससमोर आंदोलन
वर्णद्वेषी आंदोनलकर्त्यांनी व्हाइट हाउसबाहेरही आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी आणि सुरक्षा यंत्रणांनी ताब्यात घेतले. तर, अटलांटामध्ये पोलिसांवर आंदोलनकर्त्यांनी बाटल्यांचा मारा केला. त्याशिवाय एअर गनने पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडण्यात आल्या. पोलिसांनी आपली नोकरी सोडावी अशी मागणीही यावेळी आंदोलकांनी केली.
तर आंदोलनकर्त्यांचा भयानक श्वान आणि शस्त्रांशी सामना झाला असता : ट्रम्प
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जर आंदोलनकर्त्यांनी व्हाईट हाऊसचे कंपाऊड तोडून आत येण्याचा प्रयत्न केला तर त्यांना भयानक कुत्र्यांचा आणि मी पाहिलेल्या आतापर्यंतच्या सर्वात भयावह शस्त्रांचा सामना करावा लागेल, असे वक्तव्य शनिवारी केले. त्यांनी हा धमकी वजा इशारा कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिस कारवाईत मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ आंदोलन करणाºया आंदोलकांना दिला.
ज्यावेळी हे आंदोलक संध्याकाळी व्हाईट हाऊसजवळील लाफायेट स्क्वेअर येथे मोठ्या संख्येने जमा झाले़ त्यावेळी व्हाईट हाऊस लॉकडाऊन करण्यात आले.
दरम्यान, आंदोलक आणि व्हाईट हाऊसचे सुरक्षा अधिकारी यांच्यात धक्काबुक्कीचीही घटना घडली. या प्रकारानंतर अध्यक्ष ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसची सुरक्षा करणाºया अधिकाºयाचे कौतुक केले. मी आतून सगळे काही पाहत होतो़ मला यापेक्षा सुरक्षित कधी वाटले नाही. स्थिती व्यावसायिकपणे हाताळली. मोठा जमाव जमला होता़ तो हेतू पुरस्कर जमवला होता. पण, कोणालाही व्हाईट हाऊसची भींत लांघता आली नाही. जर त्यांनी ती लांघली असती तर त्यांना भयानक कुत्रे आणि अत्यंत भयानक शस्त्रांचा सामना करावा लागला असता. अनेक सिक्रेट सर्व्हिसेसचे एजंट वाटच पाहत होते, असे वक्तव्य केले.
त्यानंतर ट्रम्प यांनी ट्विटची मालिका पोस्ट केली, त्यात ट्रम्प यांनी त्यांच्या सर्व समर्थकांना एक्झिक्युटिव्ह मेन्शनच्या बाहेर रॅली करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले की आज रात्री मला व्हाईट हाऊसवरील मेगा नाईट समजली. डोनाल्ड ट्रम्प यांचे मेगा स्लोगन म्हणजे मेक अमेरिका ग्रेट अगेन. याचबरोबर ट्रम्प यांनी वॉशिंग्टन डी. सी.चे महापौर म्युरेल बोव्हसेर यांनी अमेरिकी गुप्तचर कर्मचाºयांच्या मदतीसाठी पोलिस पाठवण्यास नकार दिल्याचाही आरोप केला. पण, वॉशिंग्टन पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार पोलिसांच्या काही अधिकाºयांनी आंदोलनकर्त्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी मदत केली होती. या प्रकरणी महापौरांच्या कार्यालयाने आणि डी. सी. पोलिसांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. डोनाल्ड ट्रम्प यांनी जर आंदोलनाच्या आडून लूटपाट केली तर शूट करण्यात येईल, अशा आशयाचा इशारा दिला होता. लूटिंग झाले तर शूटींग होणार, या ट्विटवरुन ट्विटरने त्यांना वॉर्निंग दिली आहे. तर डेमॉक्रॅट पक्षाने या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे.