कोलंबो : श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा दिल्यानंतर देशातील परिस्थिती आणखी चिघळली आहे. सरकारविरोधी निदर्शकांनी राजपक्षे यांच्या मंत्रीमंडळातील मंत्री सनथ निशांत यांच्या घराला आग लावली.
एवढेच नाही तर सत्ताधारी पक्षाच्या समर्थकांनी कोलंबोमध्ये सरकारविरोधी निदर्शने करणा-यांना मारहाण केल्याची देखील घटना घडली आहे. या हिंसाचारात आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला आहे. हिंसाचार भडकवल्याप्रकरणी महिंदा राजपक्षे यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे.