30.9 C
Latur
Monday, May 10, 2021
Homeआंतरराष्ट्रीयवुहानमध्ये विषाणू बॉम्ब?

वुहानमध्ये विषाणू बॉम्ब?

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: एखाद्या महामारीची साथ संपुर्ण मानवी जीवनाला किती धोकादायक ठरु शकते, याचा अनुभव गेल्या दीड वर्षांपासून संपुर्ण जग घेत आहे. चीनच्या वुहानमधून प्रसारित झालेल्या कोविड-१९ विषाणूमुळे जगभरात लाखोंच्या संख्येने लोक मरण पावले व अर्थव्यवस्थाही प्रचंड मोठ्या प्रमाणात रसातळाला गेल्या.

मात्र धक्कादायक बाब म्हणजे चीनची बदमाशी अजूनही चालूच असून वुहानमध्ये कोरोना विषाणुपेक्षाही अत्यंत धोकादायक अशा अनेक विषाणुंचा साठा असून त्यांना सुरक्षितपणे न ठेवल्याने त्यांचा प्रसार सुरु झाल्यास कोरोनापेक्षाही घातक महामारींचा जगाला पुन्हा सामना करावा लागण्याची शक्यता शास्त्रज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

आंतरराष्ट्रीय शोधकर्त्यांच्या एका टीमने हा दावा केला आहे. वैज्ञानिकांनी चीनच्या अन्य शहरातील कृृषि प्रयोगशाळेतील तांदूळ आणि कापूस यांच्या गुणसुत्रीय माहितीवरुन ही बाब जगासमोर आणली आहे. गुणसुत्रीय माहितीचे विश्लेषण केल्यानंतर त्यांनी वुहान परिसरात कोरोनापेक्षाही घातक विषाणुंचा साठाच असल्याचे म्हटले आहे.

कृषि प्रयोगशाळेत मेडिकल रिसर्च सेंटरमध्ये किंवा वायरोलॉजी लॅबप्रमाणे मजबूत सुरक्षा व्यवस्था नाहीत, त्यामुळे हे विषाणू प्रयोगशाळेतून बाहेर पडण्याची अधिक शक्यता आहे. तसे झाल्यास चीनमुळे पुन्हा जगापुढे मृत्यूचे मोठे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र चीन सरकारकडून याचे खंडन करण्यात आले आहे.

कुराणातील आयती रद्द करण्याबाबत याचिकेवर सुनावणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,494FansLike
184FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या