23.4 C
Latur
Sunday, August 9, 2020
Home आंतरराष्ट्रीय विमानातून जायचय मग छत्री घेऊनच जा?

विमानातून जायचय मग छत्री घेऊनच जा?

मॉस्को :विमानातून जायचय मग छत्री घेऊनच जा? होय असेच आहे काहीस. उद्या घरातून बाहेर पडताना तुमच्या घरातील लोक असच म्हणतील. छाता ले जाना नही भुलना. असाच काहीसा गमतीदार प्रकार घडला आहे.  विमानात अचानक पाणी गळू लागल्यामुळं चक्क सहप्रवासी छत्री घेऊन बसले होते. सध्या एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चक्क विमानाच्या आत पाऊस पडताना दिसत आहे.

हा व्हिडीओ रशियाचा असून Rossiya Airlines च्या एका विमानात ही घटना घडली. हे विमान खोबरोव्स्कहून सोचीला जात होता. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता ही काही प्रवासी छत्री घेऊन बसले आहेत.

हा व्हिडीओ आतापर्यंत 6000हून अधिक लोकांनी पाहिला आहे. 11 जुलै रोजी हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर एअरलाइन्सननं हे पावसाचे पाणी नसल्याचे सांगितले आहे. एअरलाइन्स कंपनीने दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या एसीमध्ये गळती झाली होती. त्यामुळं पाणी गळती होती. अशातच प्रवासी छत्री घेऊ बसले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,140FansLike
93FollowersFollow