24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeआंतरराष्ट्रीयअझरबैजान-आर्मेनियामध्ये युध्द; १०० सैनिक ठार

अझरबैजान-आर्मेनियामध्ये युध्द; १०० सैनिक ठार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : एकीकडे रशिया आणि युक्रेनच्या युद्धाला सहा महिने उलटले आहेत, मात्र संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाही. तर दुसरीकडे आर्मेनिया आणि अझरबैजान या देशांमध्येही संघर्ष सुरु झाला आहे. या संघर्षात एका रात्रीत १०० सैनिकांचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. आर्मेनिया आणि अझरबैजान या देशांमध्ये सीमासंघर्ष पुन्हा एकदा सुरु झाला आहे. दोन्ही देशांमधील हा संघर्ष आता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सुत्रांच्या हवाल्याने समोर आलेल्या रिपोर्टनुसार, मंगळवारी रात्री दोन्ही देशांमधील एकूण १०० सैनिकांचा मृत्यू झाला आहे.

अनेक महिन्यांच्या शांततेनंतर अझरबैजान-आर्मेनिया यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा पेटला आहे. या पार्श्वभूमीवर आर्मेनियाच्या सुरक्षा परिषदेने आपात्कालीन बैठक बोलावली आहे. या दोन्ही देशांतील परिस्थिती अशीच चिघळली तर दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरु होण्याची शक्यता आहे. आर्मेनियाच्या सुरक्षा मंत्रालयाने अझरबैजानने सीमावर्ती भागात गोळीबार केल्याचा आरोप केला आहे.

लष्करी कारवाई केल्याचा अझरबैजानचा आरोप
आर्मेनियाने लष्करी कारवाई केल्याचा आरोप अझरबैजानने केला आहे. आर्मेनियाने १२ सप्टेंबरच्या रात्री उशिरा सीमेवरील दस्कासन, कलबाजार आणि लाचिन भागात मोठ्या प्रमाणावर लष्करी कारवाई केल्याचा आरोप अझरबैजानने केला आहे. आर्मेनियन सशस्त्र दलांनी अंधाराचा फायदा घेत त्यांच्या लष्करी चौक्या आणि पुरवठा लाइन रस्त्यांच्या दरम्यानच्या भागात स्फोटके पेरली. यामुळे अझरबैजानला परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी बचावात्मक उपाययोजना करण्यास प्रवृत्त केले. यामुळे दोन्ही देशांमधील संघर्ष सुरू झाला असे अझरबैजानने म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या