Wednesday, September 27, 2023

अमेरिकेकडून इशारा : ……तर आम्ही त्याला जशास तसे उत्तर देऊ

प्रत्येक आघाडीवर चीनची कोंडी करण्याची राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची रणनिती

न्यूयॉर्क : कोरोना विषाणुमुळे जगाच्या रडारवर आलेल्या चीनला आता पुन्हा एकदा अमेरिकेने इशारा दिला आहे. हाँगकाँगमध्ये जर जास्त वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्याला जशास तसे उत्तर देऊ असा अमेरिकेकडून इशारा देण्यात आला आहे. मागील वर्षी लोकशाही हक्कांसाठी हाँगकाँगमध्ये मोठे आंदोलन झाले होते. त्यानंतर चीन आता राष्ट्रीय सुरक्षा विधेयकाद्वारे हाँगकाँगसाठी नवा कायदा आणण्याची तयारी करत आहे. हा प्रस्तावित कायदा प्रत्यक्षात येण्याआधीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी चीनला इशारा दिला आहे. एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली.

हाँगकाँगवर अधिक नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केल्यास अमेरिकेकडून अत्यंत कठोर प्रतिक्रिया उमटू शकते असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. हाँगकाँगची स्वायत्तता आणि मानवी हक्कांचा आदर राखणे अत्यंत महत्वाचे आहे असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

Read More  बाधितांच्या संपर्कात आलेल्या दोघांना कोरोना संसर्गाची बाधा

हाँगकाँग हे जगातील महत्वाचे वित्तीय केंद्र आहे. हाँगकाँग १९९७ पासून चीनच्या नियंत्रणाखाली आहे. चीनच्या तुलनेत हाँगकाँगमध्ये अनेक सवलती आहेत. तिथली जनता लोकशाही हक्कांसाठी जागरुक आहे. त्यामुळे चीनचे सर्व कायदे हाँगकाँगमध्ये लागू होत नाहीत. मागच्यावर्षी लोकशाही हक्कांसाठी हाँगकाँगमध्ये हिंसक आंदोलन झाले होते.

आता सुद्धा चीनने इथे कायद्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केल्यास हिंसक आंदोलनाचा वणवा पेट घेऊ शकतो. करोना व्हायरसमुळे डोनाल्ड ट्रम्प यांनी सध्या चीनला आपला नंबर १ शत्रू बनवले आहे. करोना व्हायरस चीनमुळेच जगभरात पसरला. त्यामुळे ट्रम्प सातत्याने चीनला लक्ष्य करत आहेत. नोव्हेंबरमध्ये अमेरिेकेत राष्ट्राध्यक्षीय निवडणूक होणार आहे. त्याआधी प्रत्येक आघाडीवर चीनची कोंडी करण्याची ट्रम्प यांची रणनिती आहे.

Related Articles

More....

लोकप्रिय बातम्या