35.2 C
Latur
Monday, March 8, 2021
Home आंतरराष्ट्रीय आम्हाला वटवाघळे चावली - कोरोनावर वुहानच्या शास्त्रज्ञांचा अजब दावा

आम्हाला वटवाघळे चावली – कोरोनावर वुहानच्या शास्त्रज्ञांचा अजब दावा

एकमत ऑनलाईन

बीजिंग : जगभर धुमाकूळ घातलेल्या कोविड-१९ विषाणूचे खापर इतरांवर फोडण्याचे चीनचे प्रयत्न कायम आहेत. वुहानमध्ये पहिला रुग्ण आढळला म्हणजे विषाणूचे उगमस्थान ते होय असे नाही असाही दावा करण्यात आला होता. आता मात्र तेथील शास्त्रज्ञांनी कमाल केली आहे. नमुने घेताना आम्हाला वटवाघळे चावली, जी बाधित असावीत, असे ते सांगत आहेत. हे शास्त्रज्ञ वुहानमधील त्याच प्रयोगशाळेचे आहेत, जेथे कोविड-१९ विषाणूचा उगम आणि जागतिक साथीचा प्रारंभ झाल्याचे मानले जात आहे.

शास्त्रज्ञांबाबतचा एक व्हिडिओ समोर आला आहे. मुख्य म्हणजे हा व्हिडिओ २०१७चा आहे, जो आता व्हायरल केला जात आहे. कोविड-१९ विषाणूचा उगम २०१९च्या अखेरीस झाल्याचे मानले जाते. जगातील अनेक प्रमुख वृत्तपत्रांनी याबाबतचे वृत्त दिले आहे. मेल ऑनलाईनमधील वृत्तानुसार एका शास्त्रज्ञाने गुहेत नमुने गोळा करताना रबरी हातमोज्यांमधून एका प्राण्याचे दात सुईप्रमाणे आत घुसल्याचा दावा केला आहे.

तैवान टाईम्सने म्हटले आहे की, व्हिडिओत एका शास्त्रज्ञाने उघड्या हातांनी वटवाघुळ धरल्याचे दिसते. एका व्यक्तीच्या अंगावरील सूजही दाखविण्यात आली आहे. वटवाघळात अनेक घातक विषाणू असतात असे व्हिडिओतील निवेदक सांगतो.

पीपीई किट न घालता संशोधन
या व्हिडिओनुसार वुहान विषाणूशास्त्र संस्थेचे शास्त्रज्ञ जिवंत विषाणूंबातचे काम पीपीई कीट न घालता करीत आहेत. वास्तविक जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्लूएचओ) सुरक्षेच्या नियमांचा हा भंग आहे

काँग्रेस अध्यक्षपदासाठी शिंदे आघाडीवर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या