37.8 C
Latur
Monday, May 29, 2023
Homeआंतरराष्ट्रीयकोरोना लढ्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची ३७ देशांशी आघाडी

कोरोना लढ्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेची ३७ देशांशी आघाडी

एकमत ऑनलाईन

झ्युरिक : वृत्तसंस्था
जगभरातील ३७ देश आणि जागतिक आरोग्य संघटना कोरोना विरुद्धच्या लढाईसाठी एकवटले आहेत. शुक्रवारी या आघाडीने कोरोना महामारीसंदर्भात लस, औषधे आणि निदान उपकरणे यांची सामूहिक मालकीचे आवाहन केले. या सर्व देशांना पेटंट कायद्यामुळे त्यांना कोरोनाच्या संकटात वरील सर्व सुविधा मिळण्यात अडचण येण्याची शक्यता वाटत आहे. या ३७ देशांच्या आघाडीत जवळपास सर्व अविकसित आणि विकसनशील देशांचा समावेश आहे.

श्रीमंत देश कोरोनावर लस शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर रिसोर्सेस वापरत आहेत. सध्या १०० लस विकसीत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. या सर्वांमध्ये सर्वात आधी लस तयार करण्याची स्पर्धा लागली आहे. त्यानंतर ज्याने पहिल्यांदा लस तयार केली तो त्याच्यावर आपला हक्क सांगण्याची शक्यता दाट आहे.

कोरोना विरुद्धच्या लढ्यात लस, चाचणी, निदान आणि उपचार हे महत्वाचे घटक आहेत. ते जागतिक सार्वजनिक आरोग्यासाठी सर्वांसाठी खुले करणे गरजेचे आहे, असे मत कोस्टारिकाचे अध्यक्ष कार्लोस अल्व्हार्डो यांनी मांडले. जागतिक आरोग्य संघटना आणि इतर देशांनी मिळून यासाठी संयुक्त आघाडी निर्माण करण्याचा प्रस्ताव मार्चमध्येच ठेवण्यात आला होता. याचा उद्देश कोरोना बाबातचे शास्त्रीय ज्ञान, माहिती आणि बौद्धिक संपत्तीचे एकत्रीकरण करून ती एकाच ठिकाणाहून सर्वांसाठी खुली करणे हा आहे.

Read More  राज्यात आज 2940 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; 1084 रुग्णांना डिस्चार्ज

जागतिक आरोग्य संघटनेने एकसंध कृती या मोहिमेत स्वत:हून सामिल होण्याचे आवाहन संबंधित देशांना आणि संघटनांना केले होते. जागतिक आरोग्य संघटनेचे अध्यक्ष टेड्रोस अधनोम घेब्रायसिस यांनी पेटंट व्यवस्था ही नवनवीन शोध आणि नाविन्यपूर्णतेसाठी महत्वाचे असतात पण, सध्याच्या घडीला लोकांनी प्राथमिकता ओळखली पाहिजे, असे मत व्यक्त केले. पण, जागतिक औषध निर्मिती असोसिएशनने या मोहिमेत बौद्धिक संपत्तीच्या संरक्षण दुर्लक्षित करण्यात आल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. त्यांनी एकसंध कृती ही मोहिम सर्व परिस्थितींवर एकच मॉडेल प्रमोट करते. प्रत्येक परिस्थिती, उत्पादन आणि देश वेगळेपणाचा अनादर करते, अशी प्रतिक्रिया दिली.

दरम्यान, गरीबी विरोधातील संघटन आॅक्सफामच्या धोरण व्यवस्थापक अ‍ॅना मॅरियट यांनी औषध निर्मिती करणाºया कंपन्या जागतिक आरोग्य संघटनेच्या या मोहिमेला नावे ठेवतात कारण त्यांना लोकांच्या आरोग्यापेक्षा त्यांच्या नफ्याची जास्त चिंता आहे, असा आरोप केला.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या