21.9 C
Latur
Thursday, September 23, 2021
Homeआंतरराष्ट्रीयडब्ल्यूएचओची टीम वुहानमध्ये दाखल

डब्ल्यूएचओची टीम वुहानमध्ये दाखल

एकमत ऑनलाईन

बीजिंग : संपूर्ण जगामध्ये हाहाकार उडवून देणाºया कोरोना व्हायरसची उत्पत्ती कशी झाली? हा व्हायरस कुठून आला? त्याचे मूळ काय? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेचे तज्ज्ञांचे पथक अखेर वुहानमध्ये दाखल झाले आहे. जगामध्ये लाखो नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या, अनेक देशांचे अर्थचक्र ठप्प करणारÞ्या या व्हायरसने मानवी शरीरात कसा प्रवेश केला? ते शोधून काढण्यासाठी तज्ज्ञांची टीम वुहानमध्ये पोहोचली आहे.

कामाला सुरुवात करण्याआधी दहा शास्त्रज्ञांच्या या टीमला दोन आठवडे क्वारंटाइनमध्ये रहावे लागणार आहे. कोरोना व्हायरसची उत्पत्ती कशा झाली? हे अद्याप न उलगडलेले कोडे आहे. काही तज्ज्ञांच्या मते प्राण्यांमधून या विषाणूने मानवी शरीरात प्रवेश केला आहे, तर काहींच्या मते हे मानवनिर्मिती संकट आहे. त्यासाठी वुहानमधल्या प्रयोगशाळेकडे संशयाने पाहिले जाते.कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण चीनच्या वुहान शहरात आढळला होता. त्यानंतर हा संसर्गजन्य आजार जगभरात वेगाने फोफावला. आधीच या व्हायरसचे मूळ शोधण्याला बराच विलंब झाला आहे.

चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय
डब्ल्यूएचओची टीम चीनमध्ये दाखल झालेली असताना, तिथे पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. उत्तर चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. चीनने कोरोनावर ब-यापैकी नियंत्रण मिळवले होते. पण तिथे पुन्हा रुग्ण संख्या वाढत आहे. एका प्रांतामध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे.

एकाच घराच्या पत्त्यावर १०२ मतदारांची नोंदणी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या