22 C
Latur
Saturday, January 16, 2021
Home आंतरराष्ट्रीय कॅलिफोर्नियाच्या जंगलात भीषण आग; ८ जणांचा मृत्यू

कॅलिफोर्नियाच्या जंगलात भीषण आग; ८ जणांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

कॅलिफोर्निया : कॅलिफोर्नियाच्या जंगलात भीषण आग लागली आहे. आगीत आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू झाला असून तब्बल ५ लाख लोक बेघर झाले आहेत.

अत्यंत वेगाने ही आग पसरत असून आगीने रौद्र रूप धारण केले आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचा सर्वाधिक फटका हा ओरेगनला बसला असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सॅन फ्रान्सिस्कोच्या ईशान्य पूर्वेतील प्लुमास नॅशनल फॉरेस्टमध्ये बुधवारी ही आग लागली. आग एका दिवसात ४० किलोमीटरपर्यंत पसरली. काही तासांत १०३६ चौरस किलोमीटर क्षेत्राची राख झाली. आगीत २ दशलक्ष एकरवरील वनसंपदा भस्म झाल्याचे सांगण्यात येत आहे.

… ही सुद्धा देवाची करणीच का?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,406FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या