35.6 C
Latur
Sunday, March 7, 2021
Home आंतरराष्ट्रीय साधेपणाने होणार बायडन शपथ सोहळा ?

साधेपणाने होणार बायडन शपथ सोहळा ?

कोरोनाची पार्श्वभुमी ; लाखोंची गर्दी टाळणार

एकमत ऑनलाईन

वॉश्ािंग्टन: अमेरिकेचे नियोजित राष्ट्राध्यक्ष जो बायडन २० जानेवारी रोजी राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. मात्र, शपथविधी सोहळा साधेपणाने आणि लाखोंची गर्दी टाळण्याच्यादृष्टीने आयोजित करण्यात येणार आहे. अमेरिकेत कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातले असून बाधितांची संख्या वाढली आहे. त्यामुळे कमी गर्दीत आटोपशीर आणि साधेपणाने शपथ सोहळा असणार आहे.

२० जानेवारीला होणारा अमेरिकेतील अध्यक्षीय पदग्रहण सोहळा भव्यदिव्य पद्धतीचा नसेल, तर तो साधेपणाने आणि जास्तीत जास्त आभासी पद्धतीने आयोजित केला जाईल, असे संकेत अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांनी दिले. ‘अध्यक्षपदाचा शपथविधी आधीच बांधण्यात आलेल्या व्यासपीठावरच २० जानेवारीला होईल. मात्र हा सोहळा व संचलन पाहण्यासाठी नॅशनल मॉल आणि पेनसिल्व्हेनिया अव्हेन्यू येथे होणारी लाखोंची गर्दी टाळण्याची योजना आहे.

अभासी पद्धतीने पुर्वीपेक्षा जास्त गर्दी
शपथविधी सोहळा भव्य नसला, तरी यानिमित्त संपूर्ण देशभर आभासी कार्यक्रम घेतले जातील व यामध्ये पूर्वीपेक्षा जास्त संख्येने नागरिक सहभागी होतील. सध्या यावर काम सुरू आहे. त्यामुळे हा सोहळा नेमका कसा असेल, हे आता सांगता येणार नाही,’ असे बायडेन म्हणाले. हा कार्यक्रम साधारण आॅगस्टमध्ये झालेल्या डेमोक्रेटिक पक्षाच्या राष्ट्रीय संमेलनासारखा असेल व यात आॅनलाइन कार्यक्रमांची अधिकाधिक रेलचेल असेल, असेही त्यांनी नमूद केले.

भरधाव टेम्पो चालकाने वाहतूक पोलिसाला चिरडले

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,442FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या