मुंबई : मुकेश अंबानी यांचं नाव आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून घेतले जाते. पण, लवकरच आशिया खंडातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचा मान मुकेश अंबानींकडून हिरावणार अशी शक्यता आहे. आता त्यांच्या जागी दुसराच उद्योगपती घेणार आहे.
अंबानी यांच्यानंतर दुस-याच स्थानी चीनच्या सर्वात श्रीमंत उद्योगपती झोंग शैनशैन यांचं नाव आहे. त्यांच्या एकूण संपत्तीमध्ये तब्बल ७८८ मिलियन डॉलर्सनी वाढ झाली आहे.
ज्यामुळं त्यांची संपत्ती ६८.३ अब्ज डॉलर्सवर पोहोचली आहे. अंबानी आणि झोंग यांच्या संपत्तीमध्ये 9 अब्ज डॉलर्सचा फरक आहे. त्यामुळं ही दरी भरून निघाली तर अंबानी यांच्या जागी झोंग हे घेऊ शकतात. २०२० मध्ये झोंग यांच्या संपत्तीचा आकडा अंबानींपेक्षा जास्त होता. पण, त्यांचा हा आनंद फार काळ टिकू शकला नाही
श्रीमंतीच्या बाबतीत अंबानींना टक्कर देणारे झोंग हे “नॉन्गफू स्प्रिंग” चे मालक आहेत. ही कंपनी चिनी बाटलीबंद पाणी आणि पेय कंपनी आहे. तसेच ते आशिया खंडातील ते दुस-या क्रमांकाचे अब्जाधिश आहेत. त्यांच्या मागोमाग गौतम अदानी यांचं नाव येतं. जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत झोंग यांना २१ वं स्थान मिळालं आहे.