22.9 C
Latur
Wednesday, July 28, 2021
Homeआंतरराष्ट्रीयनेपाळमध्ये ओलींना धक्का बसणार?

नेपाळमध्ये ओलींना धक्का बसणार?

एकमत ऑनलाईन

काठमांडू: भारताच्या भूभागावर दावा ठोकल्यानंतर नेपाळचे पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांच्यासमोरील राजकीय अडचणी अद्यापही संपुष्टात आल्या नाहीत. भारताविरोधात निर्णय घेतल्यानंतर सत्ताधारी नेपाळ कम्युनिस्ट पक्षात सुरू झालेला वाद अद्यापही शमला नाही.

सत्तारूढ नेपाळ कम्युनिस्ट पक्षाची बैठक कोणत्याही निर्णयाविना बुधवारी संपली. पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांनी स्वतंत्र राजकीय भूमिका सादर करण्यासाठी १० दिवसांची मुदत मागितल्याने बैठकीत कोणताच निर्णय होऊ शकला नाही.

ओली हे पक्षाशी सल्लामसलत न करता सरकार चालवित असल्याचा आरोप त्यांचे विरोधक पुष्प कमल दहल प्रचंड यांनी केला आहे. त्याला उत्तर देताना ओली यांनी १० दिवसांची मुदत मागितली, अशी माहिती पक्षाचे प्रवक्ते नारायणकाजी श्रेष्ठ यांनी दिली. त्यामुळे पुढील बैठक २८ नोव्हेंबर रोजी होणार आहे.

कंपन्यांच्या सीएसआरमधून कर्मचा-यांचे लसीकरण करु द्या : किरण शॉ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या