23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeआंतरराष्ट्रीयस्विसमधील खातेदारांच्या माहितीचा तिसरा संच देणार

स्विसमधील खातेदारांच्या माहितीचा तिसरा संच देणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : स्वीस बँकेत भारतातील काळा पैसा असणा-या खातेधारकांची माहिती याच महिन्यात मिळणार आहे. पहिल्यांदाच स्वित्झर्लंडमधील भारतीयांच्या मालकीच्या स्थावर मालमत्तेची माहिती मिळणार आहे. स्वित्झर्लंडची स्विस बँक भारतीय खातेधारकांच्या माहितीचा तिसरा संच या महिन्यात भारत सरकारला देईल. ही माहिती ऑटोमेटिक एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन (एईओआय) अंतर्गत दिली जाईल. या संचात पहिल्यांदाच भारतीयांच्या मालकीच्या स्थावर मालमत्तेचाही तपशील असेल, असे वृत्त आहे.

परदेशातील काळ्या पैशाविरोधातील भारत सरकारच्या लढाईतील महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून भारताला या महिन्यात स्वित्झर्लंडमधील भारतीयांच्या मालकीचे फ्लॅट, अपार्टमेंट आणि कंडोमिनियमचे संपूर्ण तपशील मिळणार आहेत. तसेच अशा मालमत्तांवरही कर आकारला जाऊ शकतो.स्वित्झर्लंड तसेच युरोपियन देशांसाठी हे पाऊल खूप महत्वाचे आहे. स्विस बँंिकग प्रणाली काळ््या पैशासाठी सुरक्षित आश्रयाची दीर्घकालीन असलेली समज बदलून ती एका प्रमुख जागतिक वित्तीय केंद्र बनण्यासाठी प्रयत्नशील आहे.

स्वित्झर्लंडमध्ये भारतीयांकडे असलेली बँक खाती आणि इतर आर्थिक मालमत्तेचा तपशील भारताला मिळण्याची ही तिसरी वेळ असेल. तसेच भारताला देण्यात येणा-या माहितीमध्ये स्थावर मालमत्तेची माहिती समाविष्ट असेल. स्वित्झर्लंड फॉर यूएस नावाच्या कंपनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हिमांशू यांनी स्विस सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. स्वित्झर्लंडने गेल्या २ वर्षांत प्रत्येक वेळी सुमारे ३० लाख खातेधारकांचा तपशील जाहीर केला आहे. मात्र, यावेळी ही संख्या वाढण्याची शक्यता आहे.

सप्टेंबर २०१९ मध्ये मिळाला पहिला संच
स्विस बँकेने आपल्या खातेधारकांची माहिती लपवण्याचे कोणतेही कारण नाही. भारताला या माहितीचा पहिला संच सप्टेंबर २०१९ मध्ये आणि दुसरा संच सप्टेंबर २०२० मध्ये स्विस बँकेकडून ऑटोमेटिक एक्सचेंज ऑफ इन्फॉर्मेशन अंतर्गत मिळाला. स्विस सरकारने परदेशी गुंतवणुकीची माहिती या वर्षीदेखील देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, डिजिटल चलनाचा तपशील देण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे हिमांशू यांनी सांगितले.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या