34.3 C
Latur
Tuesday, April 20, 2021
Homeआंतरराष्ट्रीयविषाणूच्या उत्पत्तीबाबत पुनर्विचार करणार; चीन पुन्हा संकटात

विषाणूच्या उत्पत्तीबाबत पुनर्विचार करणार; चीन पुन्हा संकटात

एकमत ऑनलाईन

न्युयॉर्क : कोविड -१९ विषाणूच्या उत्पत्तीच्या तपासणीबद्दल चीनवर पुन्हा संकटाचे ढग घोंगावू लागले आहेत. कोरोना विषाणू चीनी प्रयोगशाळेतून गळती झाल्याच्या सिद्धांताबाबत चीनकडून अपूर्ण माहिती मिळाल्याच्या अमेरिकेने पुन्हा दावा केला असून याबाबत पुनर्विचार करण्याबाबतचे मत डब्ल्यूएचओच्या प्रमुखांनी व्यक्त केले आहे. परिणामी चीन पुन्हा एकदा अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत.

मंगळवारी डब्ल्यूएचओ आणि चीनी तज्ज्ञांनी प्रसिद्ध केलेल्या अहवालात कोविड -१९ च्या विषाणूच्या प्रसारामागे वेगळाच प्राणी असल्याची नोंद केली होती. चीनने या अहवालाचे जोरदार स्वागत केले होते. चीनच्या वुहानमधील व्हायरलॉजीच्या प्रयोगशाळेतून हा विषाणू प्रथम उद्भवला आणि या विषाणूमुळे कोविड -१९ हा साथीचा रोग निर्माण झाला असावा या सिद्धांतास चीनने ठामपणे नकार दर्शविला असल्याचे या अहवालात सुरुवातीला म्हटले आहे.

परंतु नंतर डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस गेबेरयसियस यांनी विषाणूची उत्पत्ती प्रयोगशाळेतूनच झाली असल्याच्या शक्यतेचा पुनर्विचार करण्याचे वक्तव्य केले. त्यासाठी त्यांनी जानेवारीत वुहानच्या दौºयात चीनने तज्ज्ञांना प्रवेश न देण्यासाठी दिलेल्या कारणांचा उल्लेख केला आहे.

कृषि कायद्यांचा चेंडू सर्वोच्च न्यायालयात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,478FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या