23.4 C
Latur
Tuesday, August 16, 2022
Homeआंतरराष्ट्रीयविम्बल्डन : माजी विजेत्यांसाठी अजिंक्यपदाचा मार्ग खडतर

विम्बल्डन : माजी विजेत्यांसाठी अजिंक्यपदाचा मार्ग खडतर

एकमत ऑनलाईन

लंडन : विक्रमवीर राफेल नदालने उपांत्य सामन्यातून माघार घेतल्यामुळे नोवाक जोकोविचसाठी विम्बल्डन विजेतेपदाचा मार्ग मोकळा झाला अशी शक्यता असली, तरी नदालपेक्षा धोकादायक निक किर्गिऑसचा सामना जोकोविचला अंतिम फेरीत करावा लागणार आहे.

ताकदवान आणि वेगवान सर्व्हिससाठी किर्गिऑस ओळखला जातो. त्याच्या याच सर्व्हिसची अधिक भीती जोकोविचला आहे. या दोघांमध्ये फारशा लढती झालेल्या नाहीत. अवघे दोन एटीपी सामने झाले आहेत आणि तेही किर्गिऑसने जिंकलेले आहेत, त्यामुळे जोकोविच कसा जिंकणार असा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडला आहे.

२०१७ मध्ये अऐकापॉल्को येथे जोकोविच आणि किर्गिऑस प्रथमच आमनेसामने आले होते, त्याच किर्गिऑसने तब्बल २५ बिनतोड सर्व्हिस करून विजय मिळवला होता. त्यानंतर इंडियान वेल्स येथे १४ बिनतोड सर्व्हिस करून किर्गिऑसने जोकोविचला बेजार केले होते. त्यानंतर हे दोघे आज एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत.

टेनिसमधील धोरणात्मक विश्लेषक ऑशान्सी हे किर्गिऑसविरुद्धच्या त्या दोन्ही सामन्यांत जोकोविचच्या टीमचे सदस्य होते. त्याच ऑशानसी यांच्याकडे जोकोविचने धाव घेतलीे. किर्गिऑसच्या वेगवान आणि धारदार सर्व्हिसचा अभ्यास करा आणि त्यावर कसा मार्ग काढता येईल याचे उत्तर मला द्या, अशी विनंती जोकोविचने औशान्सीकडे केली आहे, पण त्या वेळच्या आणि आताच्या स्थितीत काहीही फरक पडललेला नाही, असे ऑशान्सीचे म्हणणे आहे.

किर्गिऑसकडे दुस-या सर्व्हिसमध्ये वेग कमी-जास्त करण्याची चांगली क्षमता आहे. जोकोविचला त्याच्या सर्व्हिसवर गुण मिळवायचे असतील तर याकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. वास्तविक दुसरी सर्व्हिस हीच किर्गिऑसचे प्रमुख अस्त्र आहे. त्यावरच तो अधिक गुण मिळवतो.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या