33.7 C
Latur
Saturday, May 28, 2022
Homeआंतरराष्ट्रीयअमेरिकेत रुग्णसंख्येचा जागतिक विक्रम

अमेरिकेत रुग्णसंख्येचा जागतिक विक्रम

एकमत ऑनलाईन

वॉशिंग्टन : अमेरिकेत कोरोना संसर्गाने थैमान घातल्याचे पाहायला मिळत आहे. शनिवार दि़ ७ नोव्हेंबर रोजी एकाच दिवसात कोरोनाच्या सव्वा लाख नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यासह अमेरिकेत एका दिवसात सर्वाधिक कोरोना रुग्णांच्या नोंदीचा जागतिक विक्रम झाला आहे. जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या माहितीनुसार, कोरोनाच्या संसर्गाला सुरुवात झाल्यापासून २४ तासांत नोंद होणा-या कोरोना रुग्णांच्या संख्येपैकी ही सर्वात मोठी संख्या आहे़ अमेरिकेत शुक्रवार दि़ ६ नोव्हेंबर रोजी देशात १ लाख २५ हजार ५९६ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.

हॉपकिन्सच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेत शुक्रवारी देखील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ सुरुच राहिली. सलग तिस-या दिवशी अमेरिकेत २४ तासांत १ लाखांपेक्षा अधिक रुग्णांची नोंद झाली आहे. याशिवाय अमेरिकेत एका दिवसात १ हजार १३७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यानंतर अमेरिकेतील एकूण कोरोना मृत्यूचा आकडा २ लाख ३६ हजार २५ वर गेला आहे.

कोरोनाचे सर्वात जास्त नुकसान अमेरिकेत
कोरोनाच्या रुग्णांची आणि कोरोनामुळे होणा-या मृत्यूंचा विचार केला तर दोन्हीबाबतीत अमेरिका आघाडीवर आहे. जॉन्स हॉपकिन्सच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेच्या १३ राज्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग सर्वाधिक आहे. या राज्यांमध्ये कोलोराडो, इलिनोईस, इंडियाना, आयोवा, मॅन, मिनेसोटा, नेब्रास्का, न्यू हॅम्पशायर, नॉर्थ डकोटा, ओहायो, ओक्लाहोमा, यूटा आणि वेस्ट व्हर्जिनियाचा सहभाग आहे.

११ हजारांहून अधिक आयसीयूत
दुसरीकडे ३८ राज्यांमध्ये मागील आठवड्याच्या तुलनेत सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे़ कोविड ट्रॅकिंग प्रोजेक्टनुसार, सध्या अमेरिकेत ५४,००० पेक्षा अधिक रुग्ण रुग्णालयांमध्ये दाखल आहेत. यातील ११,००० आयसीयूमध्ये आहेत. त्यामुळे मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.

तज्ज्ञांनी महिनाभराआधीच दिला होता इशारा
विशेष म्हणजे तज्ज्ञांनी महिनाभराआधीच याबाबत इशारा दिला होता. जूनमध्ये प्रतिदिवशी जवळपास ४० हजार नव्या रुग्णांची नोंद होत होती. तेव्हाच अमेरिकेच्या नॅशनल इंन्स्टिट्यूट ऑफ अ‍ॅलर्जी अँड इन्फेक्शन्स डिसिजचे संचालक अँथोनी फौची म्हणाले होते, जर अमेरिकेने कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी अधिक कठोर परिश्रम घेतले नाही, तर १ लाखापेक्षा अधिक नव्या रुग्णांची नोंद होऊ शकते.

कोरोना संकटात डेंगीचा डंख

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या