न्यूयॉर्क : लग्नगाठी स्वर्गात बांधल्या जातात ही म्हण तुम्ही ऐकली असेलच. मात्र या लग्नगाठीचे नाते या पृथ्वीवरच निभवावे लागते. नात्यात कसे वातावरण असावे जेणेकरून नाते चांगले टिकेल आणि गूड मॅरेज म्हटले जाईल. असेच एक लग्न विश्वविक्रमी ठरले आहे. त्यांनी ८२ वर्षांच्या वैवाहिक जीवनाचा विश्वविक्रम केला आहे.
डिक्शनरीबद्दल बोलायचे झाल्यास, लग्न, विवाह आणि मॅरेज या शब्दाचा सरळ अर्थ संस्कार, आनंद, समाधानाशी जोडलेला आहे. पण वास्तवात लग्न या शब्दांत बांधले जाऊ शकते का? जर तुम्ही यावर विचार केला तर समजून घ्या तुम्ही गूड मॅरेजची पायाभरणी केली आहे. १९१९ मध्ये जन्मलेले अमेरिकेतील युजेन ग्लाडू आणि १९२२ मध्ये जन्मलेल्या डोलोरेस ग्लाडू असेच जिंदादिल दाम्पत्य आहे. ज्यांच्या नावे दीर्घ आणि आनंदी वैवाहिक आयुष्य घालवल्याचा विश्वविक्रम आहे.