23.8 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeआंतरराष्ट्रीयझुकेरबर्ग व्हॉट्सऍप लिलावात काढणार!

झुकेरबर्ग व्हॉट्सऍप लिलावात काढणार!

एकमत ऑनलाईन

न्यूयॉर्क : फेसबुकने आपल्या कंपन्यांच्या ग्रुपची वर्षभरापूर्वी बनविलेली मेटा कंपनी अक्षरश: मेटाकुटीला आली. मेटाच्या महसुलात पहिल्यांदाच घट झाली आहे. याचा थेट परिणाम मेटाच्या मालकीच्या मॅसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सअ‍ॅपवर देखील झाला. यामुळे कंपनी व्हॉट्सऍप लिलावात काढण्याची शक्यता आहे.

रिपोर्टनुसार मेटाचा एकूण महसूल १ टक्क्याने घसरला आहे. यामुळे मेटाचे उत्पन्न जवळपास २८.८ बिलियन डॉलर म्हणजेच २३ हजार अब्ज रुपये झाला आहे. तिस-या तिमाहीमध्येही महसुलात मोठी तूट होण्याची शक्यता कंपनीने वर्तविली आहे. तिस-या तिमाहीत हा महसूल २० हजार अब्ज रुपये एवढा खाली येऊ शकतो.

फेसबुकशिवाय मेटाचा एकूण नफा ३६ टक्क्यांनी घटला आहे. हा फायदा ६.७ अब्ज डॉलर एवढा झाला आहे. फेसबुकची मेटाव्हर्सवर मोठी योजना आहे. यामुळे यात कंपनीने अब्जावधी डॉलर्स गुंतविले. हे मार्क झुकेरबर्गचे स्वप्न आहे आणि त्यावर खास डिव्हीजन रियॅलिटी लॅब्ज काम करत आहे. या डिव्हिजनने गेल्या तिमाहीत २.८ अब्ज डॉलर्सचा तोटा नोंदविला होता.

ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार कंपनीने व्हॉट्सअ‍ॅपवर सर्वाधिक पैसा गुंतविला होता. मात्र, कंपनीला यातून काही फायदा होताना दिसत नाही. झुकेरबर्गला इन्स्टाग्रामवर लोकांना खिळवून ठेवायचे आहे. यासाठी इन्स्टाला ते ‘टिकटॉक’सारखे बनविण्याच्या प्रयत्नात आहेत.

परंतु, फेसबुकला महिला आणि तरुणांनी, अल्पवयीनांनी काहीशी नापसंती देण्यास सुरुवात केली आहे. ते फेसबुकवर जास्त सक्रीय नसतात. यामुळे कंपनीच्या वाढीवर परिणाम झाला आहे. याशिवाय ऍपल कंपनीने देखील फेसबुकविरोधात मोठी मोहीम उघडली आहे.

फेसबुक ऍपद्वारे युजरला टार्गेट करणा-या जाहिरातदारांना ऍपल ब्लॉक करू लागली आहे. याचा मोठा परिणाम फेसबुकच्या रिव्हेन्यूवर झाला आहे. व्हॉट्सअ‍ॅप हे जगातील सर्वाधिक वापरले जाणारे मेसेजिंग ऍप आहे, परंतू त्यावरून इन्स्टासारखा रेव्हेन्यू मिळत नाही.

२०१२ मध्ये इंस्टाग्राम $१ अब्जांना विकत घेतले होते. त्याने २०१९ मध्ये फेसबुकला २० अब्ज डॉलर्सचा नफा कमवून दिला. त्यानंतर झुकेरबर्गने व्हॉट्सऍप १९ अब्ज डॉलर्सना विकत घेतले होते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या