गोदावरीचे पाणी स्रानासाठी अयोग्य?; अहवालात धक्कादायक खुलासा

नाशिक : प्रतिनिधी
सिंहस्थ कुंभमेळ्यात ज्या गोदावरीत डुबकी मारून भाविक पापक्षालन करणार आहेत, त्या नदीचे पाणी आचमन तर दूरच, साध्या स्रानासाठीही योग्य नसल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अहवालातून समोर आले आहे. कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेली गोदावरी केवळ नावापुरती उरली असून, जैविकदृष्ट्या ती पूर्णपणे मृत झाल्याचे गोदावरी प्रदूषणमुक्तीसाठी याचिका दाखल करणा-या याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे.

कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणाच्या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दाखला देत पर्यावरणप्रेमींनी गोदावरी मृत होईपर्यंत दुर्लक्ष करणा-या नाशिक महापालिका आणि दोषी अधिका-यांवर कठोर कारवाईची मागणी केली. मंडळाने काही दिवसांपूर्वी गोदावरी-कपिला संगम (तपोवन), दसक परिसर (नांदूर) आणि समतानगर (टाकळी परिसर) येथील गोदापात्रातील पाण्याचे नमुने घेतले होते. त्यात पाण्यातील प्राणवायूचे प्रमाण शून्यावर आले असून, ही बाब नदीच्या जैविक मृत्यूचा दाखला असल्याचे म्हटले आहे. या विषारी पाण्यात मासे किंवा अन्य कोणताही जलचर जिवंत राहणे अशक्य बनले आहे.
तपोवन येथे पाण्यातील बीओडीचे प्रमाण सुरक्षित मानकापेक्षा २८ पट जास्त आहे. पाणी करडे पडले असून, त्याला प्रचंड दुर्गंधी येत असल्याचे अहवालात म्हटले आहे. सीओडीचे प्रमाण नदीत घातक औद्योगिक रसायने व विषारी घटक असल्याचे, तर फिकल कॉलिफॉर्मवरून प्रक्रिया न केलेले मलजल नदीत मिसळत असल्याचे दिसून येते, याकडे याचिकाकर्ते राजेश पंडित यांनी लक्ष वेधले.

कुंभमेळ्यात पुढील काळात भाविक स्रानासाठी येणार आहेत; मात्र त्या गोदावरीचा नैसर्गिक श्वास थांबलेला आहे. गोदावरी आज जिवंत जलस्रोत राहिलेली नसून, ती विनाप्रक्रिया सोडलेले सांडपाणी, मानवी विष्ठा व घातक रासायनिक कचरा वाहून नेणारी उघडी गटार बनल्याचा आक्षेप पर्यावरणप्रेमींकडून घेतला जात आहे.

प्रदूषण रोखण्यात प्रशासन अपयशी
ध्वजारोहणाने कुंभमेळ्याची नांदी झाली असताना गोदावरीचे पाणी आचमन तर दूरच, साध्या स्रानासाठीही अयोग्य आहे. या पाण्यामुळे त्वचेचे विकार, विषमज्वर, कॉलरा व यकृताचे संसर्गजन्य आजार होण्याचा धोका असल्याकडे पर्यावरणप्रेमींकडून लक्ष वेधले जात आहे. कोट्यवधींचा निधी खर्च करूनही महापालिका व संबंधित प्रशासकीय यंत्रणा गोदावरीत जाणारे सांडपाणी रोखण्यात अपयशी ठरल्याचा आरोप याचिकाकर्ते राजेश पंडित यांनी केला.

न्यायालयासमोर अहवाल ठेवणार
कुंभमेळ्याच्या भव्य-दिव्य आयोजनाचा देखावा तयार करणा-या प्रशासनाला गोदावरीच्या अस्तित्वाची चाड उरलेली नाही. गोदावरी प्रदूषण प्रकरणी दाखल याचिकेवर ३ नोव्हेंबरला सुनावणी होत आहे. यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचा हा अहवाल न्यायालयासमोर ठेवला जाईल. नदी मृत होईपर्यंत दुर्लक्ष करणा-या अधिका-यांवर कारवाईची मागणी केली जाणार असल्याचे पंडित यांनी सांगितले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला" आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
00:22
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला"आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
01:07
Video thumbnail
Nanded News | पाकिस्तानी क्रीममध्ये 48 हजार पट पारा! फॉरेन्सिक अहवालात धक्कादायक निष्कर्ष
03:02
Video thumbnail
Nanded|शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन
05:43
Video thumbnail
Solapur Well Collapse: आंबे गावात विहीर खचली; चार जण मातीखाली अडकले, बचावकार्य सुरू
01:16
Video thumbnail
Latur Accident News: टाका पाटीजवळ भीषण अपघात; दोघांचा दुर्दैवी मृत्यू
00:41
Video thumbnail
Latur Bank Election : लातूरचा मतदार सन्मान गहाण ठेवणारा नाही – आमदार अमित देशमुख यांचे मोठे वक्तव्य
05:40
Video thumbnail
Latur District Bank Election: योग्य उमेदवाराला मतदान करा – दिलीपराव देशमुखांचे आवाहन
01:10
Video thumbnail
Nanded News: आंतरपिकात गांजाची लागवड; 9 लाख 24 हजारांचा गांजा जप्त, किनवटमध्ये LCB ची कारवाई
00:43
Video thumbnail
Latur District Bank Election: धमक्या, द्वेषाशिवाय विरोधकांनी काही केलं नाही – धीरज देशमुखांचा प्रहार
04:38
Video thumbnail
Latur District Bank Election 2026: जिल्हा बँकेची सत्ता कुणाची?
11:10
Video thumbnail
Latur District Bank Election: उद्या मतदान, ३० उमेदवार आणि ९९९ मतदार
03:17
Video thumbnail
Latur Blood Shortage: लातूर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा; AB Positive रक्तगटाची सर्वाधिक टंचाई
03:28
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलच्या विजयाचा धीरज देशमुखांना विश्वास
06:14
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलला साथ द्या – ॲड. उदय गवारे यांचे आवाहन
02:59

Latest news