27.2 C
Latur
Saturday, March 7, 2026
Homeअंतरराष्ट्रीयइस्लामाबाद हल्लेखोराची ओळख पटली

इस्लामाबाद हल्लेखोराची ओळख पटली

पाक पडला तोंडघशी भारतावर केला होता आरोप

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी इस्लामाबादमधील मशिदीवर झालेल्या आत्मघाती हल्ल्याचा मास्टरमाइंड आणि त्याच्या ३ साथीदारांना अटक केली आहे. हा स्फोट इस्लामाबादमधील तलाई भागात असलेल्या खदिजा अल-कुबरा मशिदीत जुम्म्याची नमाज सुरू असताना झाला होता. या घटनेनंतर परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. या भीषण हल्ल्यात ३१ निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला होता, तर १६९ हून अधिक लोक जखमी झाले होते.

पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसिन नक्वी यांनी जाहीर केले की, अटक करण्यात आलेल्या ४ संशयितांपैकी एक अफगाण नागरिक असून तोच या संपूर्ण हल्ल्याचा मास्टरमाइंड (सूत्रधार) आहे. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली होती. सुरक्षा दलांनी रात्रभर राबवलेल्या शोधमोहिमेनंतर या दहशतवाद्यांना जेरबंद करण्यात यश आले आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी गेलेल्या सुरक्षा दलांवर आरोपींनी गोळीबार केला, ज्यामध्ये एक पाकिस्तानी पोलिस अधिकारी शहीद झाला असून तीन जण जखमी झाले.

पाकचा आरोप, भारताचे सडेतोड प्रत्युत्तर
तपासात असे समोर आले आहे की, आत्मघाती हल्लेखोर हा पाकिस्तानी नागरिक होता, परंतु त्याने नुकताच अफगाणिस्तानचा दौरा केला होता, जिथे त्याला प्रशिक्षणासह रसद पुरवण्यात आली होती. या घटनेनंतर पाकिस्तानने नेहमीप्रमाणे कोणताही पुरावा न देता भारतावर आरोप करण्याचा प्रयत्न केला होता, ज्याचा भारताने सडेतोड उत्तर देत तीव्र निषेध केला. भारताने स्पष्ट केले की, पाकिस्तानने आपल्या अंतर्गत समस्यांसाठी इतरांना दोष देण्याऐवजी स्वत:च्या भूमीवरील दहशतवादाचा नायनाट करावा.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR